पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/24

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक २ रा.

१९

१४:४९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४९, ६ डिसेंबर २०२३ (IST)

आहे व जेव्हां जेव्हां याच्या उलट प्रकार आढळून येतो तेव्हां तेव्हां तो जबरदस्तीचा ( Violence ) परिणाम आहे असें समजावें.जन्मतःच मनुष्यास जे संस्कार प्राप्त होतात तोच त्याचा स्वभाव व हा स्वभाव एकसार- खाच असतो असें काऊचें ह्मणणे आहे. यावर मेनिशियल हाणतो कीं, " तसे जर कबूल केले तर कुत्र्याचा जो स्वभाव तो बैलाचाही स्वभाव व बैलाचा जो स्वभाव तोच मनुष्याचाही स्वभाव असें मानावें लागेल. परंतु ही चूक आहे. मनुष्याने कितीही वाईट कर्म केलें तरी तो त्याचा उपजत गुण आहे असें मानतां येणार नाहीं. कारण सुस्थितीत पुष्कळ किंबहुना बहुतेक माणसे सुवृत्त अशीच असतात; आपत्काल आला ह्मणजेच त्यांच्या वर्तनांत दोष उत्पन्न होतात. ह्या दोन्ही अवस्था मनुष्यास उपजत प्राप्त होतात असें कसे ह्मणावें ? निःसंशय त्या निरनिराळ्या परिस्थितीच्या कन्या आहेत. ह्या दोन तत्ववेत्त्यांमध्ये ह्याप्रमाणे बराच वादविवाद झाला; परंतु ' मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्ति-स्वभाव- काय असावी ? या प्रश्नाचा कायमचा निर्णय त्यांत झालेला नाहीं.

 वरील दोन तत्ववेत्त्यांनंतर हस्न त्झू या नावाचा एक प्रख्यात तत्ववेत्त होऊन गेला. त्याचे मत ह्या दोघांही तत्ववेत्त्यांहून भिन्न आहे. तो ह्मणतो कीं, 'मनुष्य हा स्वभावतः निःसंशय दुष्ट प्रवृत्तीचा प्राणी आहे. ' त्याला सुवृत्त करण्याकरितां आज हजारों वर्षांपासून निरनिराळ्या दिशेने ( धर्म, कायदा, नीति वगैरे बंधनांनी ) प्रयत्न चालले आहेत. तरी देखील तो अद्याप सर्वस्वी वृत्त - सद्गुणी - बनलेला नाहीं, असे याचे प्रतिपादन आहे. हे सर्व तत्ववेत्ते ख्रिस्ती शकापूर्वीचे आहेत. या कालांतील शेवटचा महत्वाचा तत्ववेत्ता यांग- हिसंग हा होय. हा ख्रिस्तीशकापूर्वी ५३ वर्षे व ख्रिस्तीशक १८ पर्यंत होता.याचे मत असे आहे कीं, मनुष्य हा जन्मतः चांगल्या व वाईट ह्या दोन्ही प्रकारच्या संस्कारांनीं युक्त असतो. व त्यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या संस्कारांची अभिवृद्धि अगर लय होणें हें सर्वस्वी त्याच्या भोवतालच्या परि- स्थितीवर अवलंबून असतें.

 यानंतर हान यू या नांवाचा एक महान् तत्ववेत्ता व नीतिशास्त्रज्ञ होऊन गेला, ( इ० स० ७६८-८२४ ) त्यानें ह्या विषयास कांहींसें निश्चित स्वरूप प्राप्त करून दिलें. निदान त्याचे मत सर्वांस मान्य झालें असें मान- ण्यास हरकत नाहीं. हा कन्फ्युशियसचा कट्टा अभिमानी होता; हा सत्याचा