पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/26

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३ रा.

२१

१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)चंद्रकांत जाधव (चर्चा) १४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)

लेखांक ३ रा.

१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५५, ६ डिसेंबर २०२३ (IST)~ कायदा व राज्यव्यवस्था.

 चीन देशाची संस्कृति सर्व युरोपियन राष्ट्रांहून अत्यंत जुनी व कांहीं अंशी आर्यसंस्कृतीशी सादृश्य असणारी अशी आहे. अर्थात्, कायदा व शासनपद्धति ' ह्रीं जीं मानवसमाजाची दोन परिणत प्रमुख अंगें, त्यांचे अस्तित्व चीन देशांत ख्रिस्तीशकाच्या पूर्वीही असलेले दिसून येते. चिनी राष्ट्रासंबंधानें आज जी माहिती उपलब्ध आहे, तिचे पर्यालोचन केल्यास चिनी मानवसमाज अगदी रानटी स्थितीत होता कीं नाहीं व असल्यास कधीं व कितपत होता, या प्रश्नांची उत्तरे कोणासही समाधानकारकरीतीने देतां येणार नाहीत. कांही शतकांपूर्वी कित्येक युरोपियन राष्ट्र अंगाला रंग लावून व कातडी पांघरून रानटी अवस्थेत नांदत होती. ' असे विधान कोणत्याही इतिहास- कारास जसे बिनदिक्कत करतां येतें तसें विधान चीनसंबंधानें मात्र त्यास करतां येणार नाहीं. यावरून गतकालांत चीन देश सर्वतोपरी परिणतावस्थेस जाऊन पोचला होता असा अर्थ समजावयाचा नाहीं. वरील लिहिण्याचा इत्यर्थ इतकाच कीं, इतिहासाला ठाऊक असलेला चीन देशचा कोणताही काल घेतला तरी त्यांत सुधारलेल्या समाजाची लक्षणे कमजास्त प्रमाणांत परंतु टळकपणे दिसून येतात.

 ख्रिस्तीशकाच्या पूर्वीपासून चीन देशामध्यें पंचायती, राज्यसंस्था, न्यायसंस्था लोकप्रिय अशी धारेपद्धति, सुव्यवस्थित पिनल कोड, कस्टम्स - व्यापारसंबंधीं कर- सामाजिक निर्बंध ऊर्फ कायदे, नाणी, मापे, वजनें इत्यादि सुधारलेल्या मानवसमाजांत असणाऱ्या बाबी चांगल्या स्थितीत अस्तित्वांत होत्या. त्यासंबंधी कांहीं माहिती प्रस्तुत लेखांत देण्याचें योजलें आहे. इतिहासाला अवगत असलेल्या अगदी पहिल्या काळांत अर्थात् ख्रिस्तीशकापूर्वी - नाण्याच्या ऐवजीं शिंपले, रेशमाचे व तागाचे तुकडे यांचा उपयोग केला जात असे. त्यानंतर पुढे तांब्याच्या तुकड्यांत मध्यभागी भोंक पाहून त्याचा उपयोग नाण्याकरितां होऊं लागला. पुढे तांबें, रूपें व सोनें यांची नाणी अक्षरे व चित्रे यांसहित पाडण्यांत येऊ लागली व ख्रिस्ती शकाच्या ९ व्या शतकापासून हुंड्यांचा प्रचार सुरू झाला आणि १२ व्या तकांत नोटा सुरु झाल्या. हह्रीं ह्या नोटांचा प्रसार सर्व प्रांतांत फैलावला