पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/28

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३ रा.

२३

१४:५८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५८, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

 वरील सर्व प्रकारचे करांपैकी कोणताही कर जास्त वाढविणे झाल्यास तेथील अधिकान्यांना अगोदर लोकांची संमति घेणे भाग पडते. तसें न करितां कराची वाढ केल्यास त्या कराविरुद्ध लोकमत इतकें खवळतें कीं, तो कर वसूल करणे जवळ जवळ अशक्य होऊन जाते ! या कारणाकरितां अधि- कारी लोक बहुधा असलें धाडस कधी करीत नाहींत. जर एखादा कर वाढ- वावयाचें त्यांचे मनांत आलें तर ते आपल्या प्रांतांतील मोठमोठे व्यापारी, प्रतिष्ठित लोक व ज्यांचा त्या कराशी विशेष निकटसंबंध येत असेल असे लोक अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनां प्रथम आपल्याकडे बोलावून घेऊन त्यांच्याशीं बुद्धिवाद करितात व त्यांत जर त्यांस यश आले दाणजे जर त्या लोकांची संमति मिळाली तर तो कर वाढविण्यासंबंधाचे जाहिरनामे पुढे प्रसिद्ध होतात. जर कोणी याखेरीज अन्य मार्गानें कर वाढवूं ह्मणेल तर त्याचे परिणाम फार अनिष्ट होण्याचा दृढ संभव असतो. *

 चिनी - शासनपद्धति ऊर्फ राज्यसंस्था एकतंत्री आहे. परंतु तिच्या द्वारें होणारा राज्यकारभार मात्र लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या धर्तीवर होत आलेला आहे. ख्रिस्ती शकापूर्वी ( ३७२ ते २८९ वर्षांच्या दरम्यान ) मेनूसियस नामक एक प्रख्यात तत्ववेत्ता चीनमध्ये होऊन गेला. त्याने ' राष्ट्रीय महत्वाच्या दृष्टीनें प्रथम लोक नंतर ईश्वर आणि त्याच्या नंतर राजा' अशी विचारसरणी प्रच लित केली असून ती चिनी लोकांच्या हाडीमासीं पूर्णपणे खिळलेली आहे. यामुळे तेथील राजसत्ता एकतंत्री असूनही तेथील कारभारांत लोकमताचे


 * तो कसा हैं एका इंग्रजानें पुढीलप्रमाणे सांगितले आहे. Any other method may lead to disastrous result. The people refuse to pay and coercion is met atonce by a general closing of shops and stoppage of trade, or, in more serious cases, by an attack on the official residence of the offending Mandrin who soon sees his house looted and levelled with the ground. In other wards, the Chinese people tax themselves.

Giles on CHICIVI.