पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/30

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३ रा.

२५

१५:०१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०१, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

परंतु, त्यास आळा घालणारे इतके नियम आहत की, त्यासंबंधांत जुलूम करणे जवळ जवळ अशक्यच होतें. अपराध्यावर जुलूम झाला अगर त्याचा निष्कारण छळ झाला तर ती गोष्ट उघडकीस येण्यास पुष्कळ साधनें करून ठेविली आहेत. आणि जर कां ती गोष्ट उघडकीस आली तर पोलीस व त्यांच्यावरील मजिस्ट्रेट या दोघांसही कडक शासन होते. याखेरीज समाजांत त्यांची अप्रतिष्ठा होऊन त्यांचे महत्व नष्ट होते. त्यामुळे त्यांचा खासगी आयुष्यक्रमही कष्टमय होतो. अशी व्यवस्था असल्यामुळे होतां होईल तोपर्यंत कबुलीजबाब काढण्याकरितां अपराध्याचे हाल करण्यास कोणी प्रवृत्त होत नाही. जीवित व मालमत्ता यांचा सुरक्षितपणा चीन देशांत चांगला आहे. मृत्यूच्या शिक्षेचा अंमल खुद्द बादशाहाच्या अर्थात् पेकीनच्या प्रधान मंडळाच्या-हुकुमावांचून सहसा केला जात नाही. यास काही थोडे अपवाद आहेत. परंतु सर्वसाधा. रण नियम वरील प्रकारचाच आहे. अपवादादाखल काही भयंकर गुन्हेगारांस तत्काल देहांतशासन करण्याचा आधिकार मोठमोठ्या अधिकाऱ्यांना दिलेला असतो. परंतु त्याची अंमलबजावणी त्यांनी सर्वस्वी आपल्या जबाबदारीवर करावयाची असते. त्यांच्या असल्या कृत्याने अन्याय झाला अगर शांततेचा भंग झाला तर त्याची सर्व जबाबदारी यांचे शिरावर असते. त्याचे परिमार्जन त्यांचे त्यांनी न केल्यास त्याबद्दल त्यांस वरिष्ठ सरकारास जाब द्यावा लागतो व क्वचित प्रसंगी शासनही भोगावे लागते. चिनी पिनल कोडाचे आणखी एक दोन विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आईबापाच्या मृत्युनंतर २७ महिनेपर्यंत लग्नसमारंभ करण्याची मनाई असते. तसेंच ह्या कालांत मृताच्या जवळच्या नातलगांनी गायनवादनादि प्रकारांपासूनही अलिप्त राहिले पाहिजे, सरकारी अधिका-यांसही हा काल एकांतवासांत घालवावा लागतो. मात्र कांही मोठ्या अधिका-यांच्या-ज्यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आपल्या कामावर हजर असणे जरूर असते त्यांच्या बाबतीत हा नियम अंमलांत आणीत नाहीत. अशा बाबतींत बादशहाच्या खास परवानगीने सूतकाचा काल तीन किंवा एक महिन्याचा ठरविण्यांत येतो व तेवढा काल मात्र सदर अधिकान्याने घरी राहून घालवावा लागतो.

 बादशहाच्या मृत्युबद्दल राष्ट्रीय सूतक पाळावे लागते. १०० दिवस पर्यंत कोणी हजामत करता कामा नये व स्त्रियांनी डोक्याचे अलंकार घालतां