पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३ रा.

२७

१५:०५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०५, ६ डिसेंबर २०२३ (IST)

संरक्षणार्थं व मालमत्तेचे संरक्षणार्थ मोठमोठे संघ आहेत आणि जो कोणी चोर त्यांच्या सपाट्यांत सांपडेल त्याचे तत्काल ते पारिपत्य करीत असल्यामुळे सहसा त्यांच्या वाटेस कोणी जात नाहीं. चिनी सरकार भांडखोर पणास बिलकुल उत्तेजन देत नाहीं.वादी लोकांनां कोर्टाकडून इतरत्र मिळणाऱ्या सवलती ह्या देशांत मिळत नाहीत. तेथे वकिलोचा धंदा उत्पन्न झालेला नाहीं. इतकेंच नव्हे तर कोर्टात वादी प्रतिवादीस जे कोणी मदत करीत असतील ते मॅजिस्ट्रेट अगर कोर्ट यांच्या अवकृपेस पात्र होतात. याचा मुख्य हेतू लोकांनीं वाद माजवू नयेत हाच असतो. व्यापारसंबंध खटले व दिवाणी कामकाज होतां होईल तोपर्यंत पंचायतीपुढे चालतें; व अधिकान्यांच्या कानावर जाण्यापूर्वीच निकालांत निघतें. चिनी माणूस कोर्टात पाऊल टाकण्यास सामान्यतः नाखुष असतो. कारण तेथे दोन्ही पक्षास बुड़ सोसावी लागते हैं व्यास प ठाऊक असतें.

 चिनी अधिका-यांस ठराविक पगार मिळण्याची व्यवस्था नाहीं ( अली. कडे ती झाली आहे. ) प्रत्येक अधिकाऱ्याने वसुलाच्या मानानें, झालेल्या वसुलांतून आपला पगार कापून घेऊन बाकीचा वसूल वरिष्ठाकडे पाठवावयाचा; त्याच्या वरिष्ठानेही तसेच करावयाचें असा क्रम अगदीं वरिष्ठ प्रतीच्या अधि- कायापर्यंत चालू असे. ही पद्धत कांहींशी सदोष असल्यामुळे युरोपियन लोकांनी तिजवर टीकेचा भडिमार केलेला आहे. परंतु ह्या सदोष पद्धतीचा अंमल सुरू असतांही कोणाही अधिकाऱ्याकडून वसुलीच्या बाबतींत प्रजेवर जुलूम होऊं शकत नाहीं; कारण लोकांमध्ये असा जुलम झाल्यास तो हाणून पाडण्याचे सामर्थ्य असतें असें युरोपियन लोकांचंच मत आहे. असल्या सदोष पद्धतींतही पुष्कळ अधिकारी लोकांच्या सन्मानास पात्र होतात, ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे.

 चीन देशांत म्युनिसिपालट्यांची स्थापना नुकतीच झालेली आहे. त्या- पूर्वी प्रत्येक गावांतील व शहरांतील लोक - विशेषतः श्रीमंत लोक स्वयंस्फूर्तीनें


 *Few officials overstep the limits which cust om has assigned to their posts, and those who do generally come to grief,

mr. Giles on civi. of china.