पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/36

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३ रा.

३१

१५:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)

कवि, इतिहासकार, टीकाकार, कलाभिज्ञ वगैरे प्रकारचे लोक होऊन गेले. यावरून या कालाचे महत्व वाचकांच्या लक्षात येईल. राजकीय, सामाजिक,औद्योगिक, धार्मिक वगैरे सर्व बाबतींत ह्या कालांत झपाट्याने प्रगति झाली. वरील सर्व बाबतीत त्या काली प्रमाणभूत ह्मणून ज्या गोष्टी ठरल्या त्या अद्यापही तशाच मानल्या जात आहेत. वंग अन्शी नामक प्रख्यात राजकीय सुधारक ह्याच काळांत होऊन गेला. त्याचा जन्म इ. स. १०२१ त झाला. तरुणपणीच त्याच्या लेखणीचे महत्व फार वाढले व पुढे तो मोठा अधिकारी बनला. तो ४८ वर्षांचा झाल्यावर बादशहाचा विश्वासुक सल्लागार बनला. त्यानंतर त्याने अनेक महत्वाच्या राजकीय सुधारणा घडवून आणल्या. लोकांवरचा कर कमी करून उत्पन्न वाढविण्याची युक्ती त्याने पुढील योजनेच्या द्वारे काढलीः-

 (१) विवक्षित जिल्ह्यांत जे पीक येईल त्यापैकी ठराविक भाग सरकार. सायाकरितां निराळा काढून ठेवावयाचा. (२) लोकांच्या गरजा भागविण्याकरितां जरूर असलेला आणखी एक भाग वेगळा काढून ठेवावयाचा. (३) नंतर राहिलेले धान्य सरकारने उक्ते विकत घ्यावयाचे व जेथे पीक झाले नसेल तेथे नेऊन व्यापारी भावाने विकावयाचें. (४) शेतक-यांना त्यांच्या पिकाच्या अदमासाने आगाऊ रकमा द्यावयाच्या. या योजनेमुळे शेतक-यांची सोय होऊन सरकारचाही फायदा होऊ लागला. राष्ट्राचे लष्करी सामर्थ्य वाढविण्या करितां याने दुसरी एक अशी योजमा केली होती की, ज्या घरांत दोन परुष असतील त्या घराने एक पुरुष लष्करी नोकरीकरितां दिलाच पाहिजे; त्याचप्रमाणे सरकारच्या खर्चाने प्रत्येक कुटुंबाने एक लष्करी घोडा पाळलाच पाहिजे: असे निर्बध त्याने घालून दिले. जमिनीची पुन्हां मोजणी व फेरतपासणी करून जमाबंदीची योग्य सुधारणाही ह्यानेच प्रथम केली. याने शिक्षणखात्यांतही उत्तम प्रकारच्या सुधारणा केल्या. याच्या पूर्वीच्या काली शिक्षणाचा भर मुख्यतः भाषाशास्त्र व साहित्य-अलंकारशास्त्र-यांवर विशेष असे. यानें तो प्रकार मोडून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र हे विषय आवश्यक केले. वनस्पतिशास्त्र, वैद्यशास्त्र, कृषिशास्त्र, हस्तकौशल्य इत्यादि गोष्टींसही त्याने उत्तेजन दिले. परंतु त्याच्या ह्या सर्व सुधारणा मान्य होण्यासारखी त्या वेळी तेथील समाजाची स्थिति नव्हती. समाज त्याच्याहून विचाराच्या बाबतीत पुष्कळसा मागे होता. त्याच्या उत्तर वयांत तो अप्रिय होऊन दरबारचीही त्याजवर