पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/37

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

खप्पामर्जी झाली. पुढे त्यानें नोकरी सोडून दिली; तेव्हां त्यानें केलेल्या कित्येक सुधारणा रद्द करण्यांत आल्या. पण त्याचें धोरण पुढे चू-शी नामक मुत्सयानें यशस्वी केलें. हा मुत्सद्दी इ० स० ११३० पासून १२०० पर्यंतच्या कालांत होऊन गेला. यानें कन्फुशियसच्या ग्रंथावर उत्तम प्रकारचें भाष्य केलेले आहे. त्या ग्रंथाचा प्रवृत्तिपर अर्थ करणारा असा हा पहिलाच ग्रंथकार होय.

 हा मोठा धोरणी व राजकार्यकुशल होता. चीनमध्ये प्रवृत्तीमार्गाचें प्राबल्य ह्यानेच सुरू केलें व तेव्हांपासून आजतागायत तें सारखे वाढत आहे. हा मरेपर्यंत एकसारखा लोकप्रिय होत गेल्यानें मरणानंतरही त्याच्यासंबंधानें लोकांच्या मनांत अत्यंत पूज्यभाव उत्पन्न झाला होता याच्यासंबंधानें अशी एक आख्यायिका आहे कीं, त्याचे शव जेव्हां पेटीमध्ये घातलें तेव्हां ती पेटी आपोआप जमिनीपासून तीन फूट उंच हवेंत तरंगत राहिली. पुढे जेव्हां त्याच्या जावयाने त्याच्या आत्म्याची प्रार्थना करून त्यास त्यानें जिवंतपणीं प्रतिपादिलेल्या थोर व उदात्त मतांची स्मृति करून दिली तेव्हां ती पेटी पुन्हां आपोआप खाली आली! सुंग राजघराण्याच्या अमदानीत चीनमध्ये देशाभिमानी लोकही पुष्कळ निपजले. ला घराण्यावर जेव्हां संक आली व चीन देश परकीयांच्या ताब्यांत जाण्याची चिन्हें दिसूं लागलीं तेव्हां अनेक देशभक्तांनी सुंग घराण्याच्या वतीनें लहून, नानाप्रकारच्या आपत्ति भोगून व प्रसंगी प्राण अर्पण करूनही आपली देशभक्ती गाजविली आहे ! तथापि अखेरीस त्यांच्या दुर्दैवाने उचल खाऊन सुंग घराण्याचा विध्वंस झाला व चीनवर मोंगोल लोकांची सत्ता स्थापन झाली ह्या लोकांनी इ० स० १२६० पासून १३६८ पर्यंत चीनवर सत्ता गाजविली. या मोंगोल घराण्यांत काबुलीखान नामक बादशहा मोठा पराक्रमी व कर्ता पुरुष होऊन गेला. त्याचें वैभव फार मोठें होतें. त्यानें कोरिया, बर्मा व अनाम हैं देश पादाक्रांत करून त्यांस चीनचे मांडलिक बनविलें होतें. त्यानें जपान- वरही जलमार्गाने मोठ्या जय्यत तयारीनें स्वारी केली. पण इंग्लंडवर स्वारी करणान्या धाडसी स्पॅनिश आरमेडाची -आरमाराची जशी धुळधाण उडाली तशीच अवस्था ह्या स्वारीचीही झाली. ह्या मोंगोल घराण्याच्या कार कीर्दीत मोगोल व मँचु या भाषांचा प्रचार चीनमध्ये सुरू झाला. काबुली - नानाने चिनी पंचांगाची सुधारणा केली व बादशाही विश्वविद्यालयाची