पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३ रा.

३३

१५:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

स्थापना केली. त्यानें सरकारी बँकेच्या नोटा प्रचलित केल्या व यलो नदीचे पात्र उगमाजवळ खणून रुंद व खोल केलें. काबुलीखान स्वतः बुद्धधर्मीय होता. तथापि कन्फुशियसचा सत्कार करण्यास तो चुकत नसे. तथापि टोई नामक धर्मपंथाचा त्यानें छल केल्यामुळे व लोकांवर करांच्या बाबतीत असह्य जुलूम केल्यामुळे त्याची प्रजा असंतुष्ट झाली. काबुलीखानाच्या अंगचें सामर्थ्य त्याच्या वंशजांत राहिलें नाहीं. या संधीचा फायदा घेऊन चिनी लोकांनी त्याच्या नातवाच्या कारकीर्दीत ( इ० स० १३६० ते ६८ ) बंड केलें. लोकमत शांत करण्याचा ह्या नातवाने बराच प्रयत्न केला. पण त्याचा कांहीएक उपयोग न होतां अखेरीस बंडवाल्यांच्या पुढायांनी ह्या घराण्याचा विध्वंस करून त्यांपैकी एकानें आपणास बादशहा ह्मणवून चीनची गादी बळकाविली.

 हा पुढारी मिंग्ज नामक चिनी घराण्यांतीलच असल्यामुळे लोकांनीही त्यास प्रोत्साहनच दिलें. याचें नांव चू युयानचंग असें होतें. त्याच्या वयाच्या १७ व्या वर्षी त्याचे आईबाप वारल्यानें त्यानें बुद्ध भिक्षूची दीक्षा घेतली. पुढे देशांत बंडाळी माजल्यावर तो लष्करांत शिरला व आपल्या · अंगच्या हुषारीनें वाढतां वाढतां एका मोठ्या सैन्याचा सेनापति बनला. इ० स० १३६८ त त्यानें मोंगोल राजघराण्यापासून अनेक चिनी प्रांत हिरा- वून घेतले व त्यानंतर लवकरच त्यानें आपल्या नांवाची द्वाही फिरविली. बादशहा झाल्यावर त्यानें हूंग वू हें नांव धारण केलें आणि नांकिंग शहर आपली राजधानी केली. तो चांगला मुत्सद्दीही होता. तसेंच शिक्षण व 'वाङ्मय यांसही त्यानें उदार आश्रय देऊन उत्तेजन दिलें होतें. चीनमध्ये सर्वांत उच्च परीक्षा घेण्याची परवांपर्यंत जी पद्धत चालू होती- जिच्यांत इल्लीं आणखी सुधारणा झाली आहे ती यानेंच सुरू केली. ह्यानें चिनी स्वदेशी पोषाख सुरू केला, पिनल कोड व वसुलपद्धति यति प्रगतिपर सुधारणा केल्या, नोटा व नाणें यांचा योग्य पुरवठा व प्रसार केला आणि हिजड्यांनां अधिकाराच्या जागा देण्याची पद्धत मोडून टाकिली. बुद्ध धर्म व टोई धर्मं दोन्ही राष्ट्रीय धर्म मानण्याचे ह्याने सुरू केलें. हा थोर बादशहा इ० स० १३९८ त वारला.

 ह्याच्यामागून ह्याचा नातू गादीवर बसला. यानें गादीवर येतांच भापल्या चुल आंशीं वैर मांडलें, तेव्हां त्यांपैकी एकानें सैन्य जमवून लाजवर