पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/39

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)चंद्रकांत जाधव (चर्चा)

स्वारी केली. त्यांत ह्याचा पराभव होऊन ह्यास पळून जावे लागले. पुढे हा वेष पालटून पेकिंग येथे जाऊन राहिला व तेथे ४० वर्षांनंतर मरण पावला असे सांगतात.

 त्याचा विजयी चुलता इ० स० १४०३ मध्ये गादीवर बसला. त्या वेळी त्याने यंग लौ हे उपपद धारण केलें, तो मोठा योद्धा व मुत्सद्दी होता. त्यानेच पेकिंग शहर बांधून तेथे आपली राजधानी केली. त्या वेळेपासून अद्यापपर्यंत चीनची राजधानी ह्याच ठिकाणी आहे. याने नवीन पिनल कोड तयार केले. तसेंच तातर लोकांवर स्वाऱ्या करून त्यांचा मोड केला. जावा, सुमात्रा व सयाम येथे आपले वकील पाठवून त्या देशांशी व्यवहार सुरू केला. हा विद्येचा मोठा भक्त होता. याने सुमारे २००० विद्वान् लोकांस पदरी ठेवून त्यांच्याकडून एक विश्वकोश तयार करविला. ह्या कोशाचे काम ५ वर्षे. पर्यंत चालू होते. त्यांत (१) कन्फ्युशियसचे ग्रंथ (२) इतिहास ( ३ ) तत्वज्ञान आणि ( ४ ) सर्वसाधारण वाङ्मय,-यांत जोतिषशास्त्र, भूगोल, सृष्टिशास्त्र, वैद्यक, धर्मशास्त्र, बुद्ध धर्म, टोई धर्म, शिल्पशास्त्र, ललितकला इत्यादींचा समावेश केला होता-इतक्या मुख्य सदरांखाली त्या त्या बाबीसंबंधी उपलब्ध असलेली सर्व माहिती देण्यांत आली होती. त्याचे सुमारे ११,००० भाग तयार झाले होते व त्यांत २२,८७७ प्रकरणे होती. प्रत्येक प्रकरणाकरितां सुमारे २० पृष्ठे खर्ची पडली होती. त्याची एकंदर पृष्टसंख्या ९,१७,४८० पृष्ठे असून शब्दसंख्या ३६,६०,००,००० इतकी होती. प्रत्येक पृष्ठाचा आकार एक फूट आठ इंच लांब व एक फूट रुंद होता. हा ग्रंथ केवढा मोठा व भव्य होता याची कल्पना येण्याकरितां एवढे सांगितले हाणजे पुरे की, त्याच्यापुढें Encyclopedia. Britanica हा जगन्मान्य ग्रंथही फिका पडेल ! हा विस्तृत विश्वकोश छापण्याचा योग कधीही आला नाही. वरील बादशहाने त्याच्या तीन प्रति करविल्या होत्या. पैकी दोन प्रतींचा नाश ह्या घराण्याच्या नाशाबरोबरच इ० स० १६४४ त झाला. तिसरी प्रत पेकींगमध्ये होती. तिचाही इ० स० १९०० च्या वेढ्यांत अंशतः नाश झाला आहे. हल्ली या ग्रंथाचे मधले मधले काही भाग उपलब्ध आहेत. या ग्रंथाची अशाप्रकारे वाताहत झालेली पाहून, 'कालाय तस्मै नमः' असे उदगार कोणाच्या तोंडून निघणार नाहीत ? विश्वकोश तयार करविणारा