पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/4

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

KarorourcrorersorrowroorrorouTorrue amororoNDA Caunloinaw प्रस्तावना. BRULARAMATKARIOINIOAAAAARAATIONALITY प्रस्तुत शतकाच्या प्रारंभी जपानने प्रबल युरोपियन राष्ट्राचा ( रशियाचा ) पाडाव करून जो दिग्विजय संपादन केला, त्याचा आशिया खंडांतील शिथिल झालेल्या राष्ट्रांवर पुष्कळसा इष्ट परिणाम घडून त्या राष्ट्रांमध्ये एक प्रकारची नवी उमेद व नवी जागृति उत्पन्न झाली. 'पाश्चात्य राष्ट्रांच्या वैभवापुढे व सामर्थ्यापुढे आपले कांही चालणार नाही' अशी जी ह्या राष्ट्रांची समजूत होती ती जपानच्या उपरोक्त विजयाने पार लयास गेली व प्रयत्न केल्यास आपणही जगांतील राष्ट्रमालिकेत योग्य पदवी प्राप्त करून घेऊ अशी भावना त्यांचे ठायीं उदित झाली. ह्या भावनेने प्रेरित होऊन गेल्या ७।८ वर्षांत ज्या ज्या राष्ट्रांनी आपले हातपाय हालविण्यास सुरवात केली, त्यांतच चिनी राष्ट्राचा समावेष होतो. रुसो-जपानी युद्ध संपेपर्यंत चिनी लोकांवर मँचू नावाच्या परकीय राजघराण्याची राजसत्ता चालत होती. परंतु त्या युद्धानंतर चीन देश जेव्हां खडबडून जागा झाला, तेव्हां त्याने स्वदेशांतील समाजांत अनेक सुधारणा करण्याचा उपक्रम सुरू करून अखेरीस थोड्या दिवसांपूर्वी लोकांनां इष्ट अशी राजक्रांति घडवून आणली. ह्या क्रांतीची चळवळ तेथे सुरू झाल्यापासून जगांतील सर्व लोकांचे लक्ष्य ह्या 'झोरी गेलेल्या 'राष्ट्राकडे वेधले व ते मोठ्या उत्सुकतेने त्या राष्ट्रासंबंधी माहिती मिळवू लागले. चिनी लोकांसंबंधी माहिती करून घेण्याच्या जिज्ञासेची जी लाट वर सांगितल्याप्रमाणे सर्व जगभर उसळली तिच्या कक्षेतून हिंदुस्थान अलिप्त राहणे अशक्य होते. अर्थात् इकडील कांही विचारी लोकांनां साहजिकच त्या जिज्ञासेने घेरले; आणि प्रस्तुत छोटेखानी पुस्तक हे त्या जिज्ञासेचेच फळ आहे. मराठी भाषेत चीन देशासंबंधी-पूर्वापारपासून तों हा कालपर्यंतची-इतकी उपयुक्त माहिती आजपर्यंत संकलित रुपानें कोणी प्रसिद्ध केलेली नसल्यामुळे प्रस्तुत लेखमाला स्वतंत्र पुस्तकाच्या रुपाने मुद्दाम प्रसिद्ध करण्यांत येत आहे. त्याचा मराठी वाचकांस योग्य तो उपयोग करून घेण्याची बुद्धि होवो, इतकें सुचवून ही अल्पशी प्रस्तावना पुरी करितो. इसलामपुर. . वासुदेव दामोदर मुंडले. श्रावण शु. १५ शके १८३५