पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/40

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३ रा.

३५

१५:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

बादशहा बुद्धधर्माचा उत्कट अनुयायी होता व त्यानें बुद्धधर्मीय लोकांस मोठ- मोठ्या अधिकाराच्या जागा दिल्या होत्या. त्याच्या आश्रयावर पेकींगमध्ये दहा हजार बुद्ध भिक्षु जगत होते. ह्या मिंग घराण्याच्या कारकीर्दीतच पुढे चित्रकलेचा अत्यंत उत्कर्ष झाला. या वेळीं प्रख्यात असे सुमारें २०० चितारी होऊन गेले. त्यांखेरीज सामान्य प्रतीचे होते ते निराळेच. यांचेच अमदानीत युरोपियन राष्ट्रांतील लोक व मिशनरी यांचा चीन देशांत चंचु- प्रवेश झाला.

 ह्या घराण्याचाही पुढे कालवशात् नाश होऊन चीनची राजसत्ता नुक- त्याच नष्ट झालेल्या मँचू घराण्याकडे आली. यासच चिंग घराणे असे हाणतात. या घराण्यांत एकंदर ९ बादशहा व एक वादशाहीण ( Dowager Empress ) झाली. पैकीं बादशाहीण 'डाउगर एंप्रेस' या नावाने प्रसिद्ध असून तिची कारकीर्द सामान्यतः इकडील वर्तमानपत्रांच्या वाचकांस माहित आहेच. जे नऊ बादशहा झाले, त्यांपैकी विशेष महत्वाचे असे दोनच होते. पैकी एकाचे नांव खंगशी असे असून तो इ० स० १६६२ पासून राज्य करूं लागला व ६० वर्षेपर्यंत गादीवर होता. हा वादशद्दाही वाङ्मयाचा मोठा भक्त होता. याने स्वतःच्या नजरेखाली चिनी भाषेचा एक बराच चांगला कोश तयार करविला. त्यांत सुमारे ४०/४५ हजार शब्द आहेत. प्रत्येक शब्दावरोवर त्याचा उपयोग कोठें कसा करण्याचा प्रघात आहे हे दर्शविण्या- करितां गतकालीन व वर्तमानकालीन ग्रंथांतून अभियुक्त अवतरणें, सुभाषितें वगैरेंचाही संग्रह ह्या कोशांत केलेला आहे. या कोशाखेरीज यानें एक विश्व- कोशही तयार करविला. हा विश्वकोश मागें उल्लेखिलेल्या विश्वकोशापेक्षां लहान आहे; परंतु बराच महत्वाचा आहे. २०० पृष्ठांचा एक याप्रमाणे त्याचे १६२८ भाग आहेत. त्यांत निरनिराळ्या विषयासंबंधाने जुनी व नवी उप- लब्ध असलेली सर्व माहिती दिलेली आहे. त्यांतील चरित्रांच्या शाखेत सुमारें ३० हजार थोर पुरुष व २४ हजार प्रसिद्ध स्त्रिया यांची त्रोटक चरित्रे आहेत. या एकाच गोष्टीवरून या कोशाचे महत्व वाचकांच्या लक्षांत येईल. त्यांत जागोजाग चित्रही दिली आहेत. याची एक छापील आवृत्ति २०/२५ वर्षां-पूर्वी निघालेली होती.

 या घराण्यांतील नांव घेण्यासारखा दुसरा बादशहा चेन् लुंग हा होय.