पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२६, ६ डिसेंबर २०२३ (IST)

हा इ. स. १७३५ त गादीवर आला व ६० वर्षे राज्य केल्यानंतर स्वहस्ताने मुलास गादीवर बसवून इ. स. १७९९ त वारला. तो आजानुबाहु होता असें ह्मणतात. तो चांगला मुत्सद्दी व राजकार्यकुशल होता; तसेच विद्येचाही तो चांगला चहाता होता. तो स्वतः कवि होता. स्वतःच्या कविता त्याला फार आवडत असत. त्याला निस्ती मिशनरी आवडत नव्हते व त्याने आपल्या राज्यांत ख्रिस्ती धर्माचा उपदेश करण्याची मनाई केली होती. त्याच्या दरबारी अनेक पंडित व निरनिराळ्या शास्त्रांत प्राविण्य संपादन केलेले विद्वान् लोक होते. त्यास गादीवर येऊन १० वर्षे होतात न होतात तोच त्याला मोठमोठ्या युद्धांत पडावें लागले. ह्या सर्व युद्धांत त्याने एकसारखे विजय मिळविले. त्याच्या सेनापतीनी नेपाळांत आपले सैन्य नेऊन तेथील गुरख्यांस जिंकले. त्रिटिश हद्दीपासून सुमारे ६० मैलांपलीकडच्या सर्व टापूंत त्याने आपला अंमल बसविला होता. ब्रह्मदेशाकडूनही त्याने खंडणी घेतली. तिबेट, कुज्ला आणि काशगेरिया या प्रांतांतही त्याने आपले वर्चस्व स्थापन केले. फोमासा व इतरत्र झालेली बं. त्याने मोडून टाकिली. याचे अमदानींत सुमारे ५० वर्षांत चीनची लोकसंख्या दुपटीने वाढली आणि सर्व देशाची एकंदरीत भरभराटच होत गेली. पोर्चुगीज, डच व इंग्रज राष्ट्रांचे वकील याच्याच कारकीर्दीत चिनी दरबारी येऊ लागले. यांचे त्या देशांतील वास्तव्य इ० स० १७५० नंतर सुरू झालेले आहे. याप्रमाणे चीन देशांतील दोन हजार वर्षांतील राजपुरुषांचा व त्यांच्या घराण्यांचा त्रोटक इतिहास आहे.

_______________