पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ४ था.

१५:२७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:२७, ६ डिसेंबर २०२३ (IST)

खेळ व करमणुकीचे प्रकार.

 चिनी लोक खेळाचे मोठे भोक्ते आहेत. कसरती, मर्दानी खेळ शिकार वगैरे प्रकार ख्रिस्ती शकापूर्वीपासून चीनमध्ये प्रचारांत आहेत. इंग्रज लोकांत हॉकी नामक जो खेळ आहे तशा प्रकारचा खेळ चीनमध्ये ख्रिस्ती शकापूर्वी एक शतकापासून चालू असल्याबद्दल लेखी पुरावा सांपडलेला आहे. सांप्रत त्या देशाच्या उत्तर भागांत हा खेळ विशेष प्रचलित आहे. प्राचीन कालीं तीरकमठे व बाण यांच्या साह्याने शिकार करीत असत. अलीकडे बऱ्याच वर्षांपासून ह्या कामी बंदुकीचा उपयोग होऊं लागला आहे. बैलांची व रेड्यांची टक्कर, हा खेळही प्राचीन काली चीनमध्ये सुरू होता. अलीकडे तो बंद झालेला आहे. ठोसाठौसी ( Boxing ) कुस्त्या, पट्टा खेळणे वगैरे प्रकारही प्राचीन कालीं तेथे अस्तित्वांत होते. जपानांतील आधुनिक जिउ- जित्सु नामक खेळ चिनांतील एका तत्सदृश खेळावरूनच निघालेला आहे. ( Boxing ) नामक मर्दानी खेळासंबंधी चिनी भाषेत एक सुंदर पुस्तक लिद्दिलेलें आहे. त्यामध्ये या खेळाच्या खुबीसंबंधाने पुढील वर्णन आहे:-

 " सर्व शरीराची हालचाल अगदी चपलतेने करता आली पाहिजे. हात व पाय यांची क्रिया इतक्या चपलतेनें व दक्षतेने चालविली पाहिजे कीं, प्रतिपक्षाच्या सूक्ष्म दिरंगाईचाही सहज फायदा घेतां येऊन हवें तेव्हां पुढें अगर मार्गे सहज जातां यावें. प्रतिपक्षावर हल्ला करितांनां पायांची हालचाल करण्यांत या खेळाचें खरें कौशल्य - रहस्य - आहे; प्रतिपक्षाला खाली लोळ- विण्यांत त्याचा ( खेळाचा ) जोमदारपणा आहे, मुठीनें तडक समोरासमोर- ठोसा लगावण्यांत त्याचे चापल्य आहे आणि प्रतिपक्षाला त्याचें तोंड वर करून स्तब्धपण दावून धरण्यांत त्याची सफाई आहे."

 फुटबॉल व पोला हे खेळही अनुक्रमें ख्रिस्ती शकाच्या ५ व्या व ८ व्या शतकापासून चीनमध्ये सुरू झाले. पोलोचा खेळ बायका देखील खेळत असत. हा खेळ चिनी लोकांनीं तार्तर किंवा इराणी लोकांपासून उचलला असावा असा तज्ञांचा तर्क आहे. पतंग उडविण्यांत तर चिनी लोकांइतके दुसरे कोणतेही लोक कुशल नाहीत. हे पतंग चित्रविचित्र रंगाचे व कांहीं तर फटाकड्यांचे डबे हवेत उड