पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/43

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३२, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

विणारे असे असतात. हे डबे उडविण्याचे काम कधीं कधीं पाळीव पक्ष्यांकडून करण्यांत येते. हे पक्षी पतंग उंच गेल्यावर वर जाऊन फटाकड्यांच्या डब्यास चोचीने अनि लावितात. त्यासरशी भराभर बार सुरू होतात. चीनमध्यें जुगा- राचे प्राबल्य विशेष आहे. लहान पोरांपासून तो बादशहापर्यंत सर्व लोक मर्जी प्रमाणॆ यथेच्छ जुगार खेळतात. मजूर लोक तर रोजच्या मधल्या सुटीत देखीले पक्ष्यांच्या साह्याने जुगार खेळतात. हे पत्ते ( cards ) इ० स० च्या दहाव्या शतकांत राजवाड्यांतील एका स्त्रीने केलेल्या नमुन्याबरहुकूम तयार केलेले असतात. युरोपियन राष्ट्रांत सुरू असलेले पत्ते बहुधा या पक्ष्यांवरूनच तयार झाले असावेत अशी कित्येकांची समजूत आहे. बुद्धिबळाच्या खेळांतही पैसे लावून खेळण्याची लालच तेथील लोकांस लागलेली आहे. ह्या जुगारामुळे पुष्कळ कुटुंबे भिकस लागली आहेत व लागत आहेत. चिनी लोकांचा हा राष्ट्रीय दुर्गुण आहे. परंतु प्रस्तुतचा चिनी अध्यक्ष युयानशिकाई याचे त्याकडे लक्ष गेलें असून तो नाहींसा करण्याविषयींचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

 चीन देशांतील मुख्य करमणुकीचा प्रकार 'नाटक' हा आहे. ह्रीं नाटकें बहुधा जुन्या ऐतिहासिक प्रसंगांवर रचलेली असतात. नाटकांतून व अखेरीस कधीं कधीं छोटेखानी फार्सही करण्यांत येतात. चिनी लोकांना इंसविणें फार कठीण आहे. अत्यंत कुशल नट असल्यावांचून प्रेक्षकगणांच्या चेह-यावर हास्यरसाची छटा कधीही उमटत नाहीं. यावरून चिनी नट व नाट्यकला हीं बरींच श्रेष्ठ दर्जाचीं असली पाहिजेत हे उघड आहे. चिनी नट तयार करणें व रंगभूमीवर त्याचें काम पसंत ठरणे ह्या दोन्ही गोष्टी फार कठीण असून त्यांप्रीत्यर्थ अत्यंत परिश्रम करावे लागतात. इ० स० १७३६ पूर्वी चीनमध्यें स्त्रिया नटाचे काम करीत असत. परंतु चैनलूंग नामक बादशहाने ( त्याची आई नटाचे काम करीत असे. ) चाल बंद केली. तेव्हांपासुन पुरुषवर्गासचं नाटकांत स्त्रियांचीं कामें करावी लागतात. पुरुष ही कामे स्त्रियांप्रमाणें अगदी वेमालुम करितात. सूक्ष्म अवलोकन करणारांसही रंगभूमीवरील स्त्रीपात्र पुरुष आहे की स्त्री आहे हे ओळखता येणार नाहीं. पाश्चात्य राष्ट्रांतील नटापेक्षां चिनी नटाचा धंदा फार कठीण आहे. पाश्चात्य रंगभूमि निरनिराळ्या देखाव्यांनी श्रृंगारलेली असते. चिनी रंगभूमीवर हे सर्व देखावे नटानें आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर