पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

 चिनी लोकांत भुताखेतांवर विश्वास ठेवणारे लोक फार आहेत ह्मणून मागें सांगितलेंच आहे. खालच्या दर्जाच्या लोकांत ह्या भुतांखेतांसंबंधीं अनेक प्रकारचे खेळ व तमाशे चालू असतात. तसेंच अंगांतील भूत काढण्याचे तिकडे जे प्रकार आहेत ते मुळचे जरी गंभीर स्वरूपाचे असले तरी सांप्रत त्यांनां पुष्कळ अंशी करमणुकीचेंच स्वरूप प्राप्त होत चालले आहे. चिनी लोक पक्ष्यांचे फार भोक्ते असून त्यांच्याकडून निरनिराळे खेळ व चेष्टा करवून ते आपली 'करमणूक करून घेत असतात. याप्रमाणे चिनी लोकांच्या खेळांची व करम- णुकीच्या प्रकारांची सामान्य माहिती आहे.

___________