पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/48

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ५ वा.

१६:०२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०२, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

विशिष्ट स्वभाव, मनोवृत्ति व चालीरीति.

 १. राजाला निर्भिडपणे योग्य असेल ती सल्लामसलत देणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, असें चिनी मुत्सद्दी मानतात व त्याप्रमाणें अनेक मुत्सद्दी आजपर्यंत राजाची वक्रदृष्टि झाली असतांही वागलेले आहेत. वाटेल तें संकट आले, प्राण जाण्याची जरी वेळ आली तरी योग्य ती सल्ला देण्याचे कर्तव्य बजावण्याचा निर्धार आजपर्यंत पुष्कळ मुत्सद्यांनीं पाळलेला आहे. मुत्सद्दी लोकांचे खरें कर्तव्य हेंच असल्याबद्दल चिनी राजपुरुषांनीही कबुली दिली असून सरकारच्या धोरणासंबंधाने बरा वाईट पण स्पष्ट अभिप्राय देण्याकरितां १४ व्या शतकापासून तेथे सरकारच्या संमतीनें एक ' दोषनिदर्शक मंडळ' स्थापन करण्यांत आलें आहे. सरकारचें अगर सरकारी अधिकान्यांचें जें सार्वजनिक कृत्य चुकीचें अगर दोषास्पद वाटेल त्यावर टीका करण्याचा अथवा त्याचा निषेध करण्याचा अधिकार ह्या मंडळास आहे. मात्र त्यानें आपली टीका खुद्द बादशहाकडे अर्जाच्या रूपाने पाठविली पाहिजे, असा नियम आहे. ह्या टीकेंत खुद्द बादशहाच्या कृत्याविरुद्ध जरी निषेधात्मक उद्गार असले तरी त्याबद्दल बादशद्दानें सदर मंडळावर रागावतां कामा नये अशी योजना आहे.परंतु कित्येक प्रसंग बादशहांनी आपला राग आवरून धरण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे ह्या मंडळांतील सभासदांस विषप्रयोग करून आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे ! पण त्यांनीं कधींही त्याबद्दल फिकीर बाळगिली नाहीं.

 २ जेव्हां एखाद्या श्रेष्ठ दर्जाच्या चिनी अधिकान्यावर बादशहाची अवकृपा होऊन त्यास जबर शासन करण्याची पाळी येई, तेव्हां त्या अधि- कान्याने विषप्रयोग करून घेण्याची इच्छा प्रदर्शित केल्यास त्याला तशा प्रकारची सवलत - परवानगी - बादशहाकडून मिळत असे.

 ३. चिनी लोक अमंगल किंवा शोकजनक प्रसंग स्पष्टपणे व्यक्त न करितां विशिष्ट प्रकारच्या सांकेतिक भाषेनें व्यक्त करितात. उदाहरणार्थ, कोणी विष खाऊन आत्महत्या केली तर त्यास 'त्यानें सोनें खाल्लें असें ते ह्मणतात. 6 बादशहा मेला' असें त्यांच्यांत कधींच हाणत नाहीत; तर बादशहा उच्चस्थानचा पाहुणा बनला आहे' असें ह्मणतात, तसेंच 'आई