पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
चीनची संक्षिप्त माहिती.

१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)

 ६. चिनी लोकांत एक गंमतीची चाल अशी आहे कीं, रस्त्यांतून जातांना जर एखाद्या मनुष्यास समोरून येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या ओळ- खीच्या मनुष्यास ओळख द्यावयाची नसेल तर त्यानें आपल्या हातांतील पंख्यानें अगर हातरुमालानें आपले तोंड झांकावें ह्यणजे झालें ! तसें केलें ह्मणजे जणुं काय त्या माणसाची व आपली गांठच पडली नाहीं असें होऊन त्या दुसन्या मनुष्यास रागावण्यास अवसर रहात नाहीं ! दुसरी एक मौजेची चाल अशी आहे कीं, जर सारख्याच योग्यतेचे दोन अधिकारी मेण्यांत बसून एकमेकांस ओलांडून जाण्याचा प्रसंग आला तर प्रत्येकजण आपल्या मेण्याच्या ज्या बाजूस दुसऱ्या अधिकाऱ्याचा मेणा असेल त्या बाजूचें दार तात्पुरते बंद करून घेतो. परंतु जर वरीलसारखा प्रसंग एक लहान व दुसरा मोठा, अशा अधिकाऱ्यांच्या दरम्यान उद्भवला तर छोट्या अधि- कान्यास बड्या अधिकाऱ्याला सलामी देण्याकरितां मेण्यांतून खाली उतरणें भाग पडते. हा प्रसंग टाळण्याकरितां धूर्त असलेले लद्दान अधिकारी, बडा अधिकारी त्याच रस्त्यानें येत आहे असें समजतांच दुसऱ्या मार्गांकडे वळून त्याच्या दृष्टिआड होतात. बडा अधिकारी रस्त्यांतून फिरावयास निघाला झणजे रस्ता मोकळा करण्याविषयीं जनतेस इषारा देण्याकरितां ढोल वाज- वितात; आणि त्या ढोलावर पडणाऱ्या ठोक्यांवरून अधिकारी कोणत्या व किती श्रेष्ठ दर्जाचा आहे हें जाणतां येतें. कारण अमुक अधिकान्यास अमुक ठोके वाजवावेत असा नियम ठरलेला असतो.

 ७. चिनी जनता सामान्यतः सौम्य स्वभावाची आहे. परंतु तिला जर कोणी विनाकारण त्रास दिला अगर चिडविलें तर मग मात्र ती वाघिणीसारखी चवताळते व दंगल उडवून देते. अशा वेळी तिला आवरून धरण्याचे काम फार जोखमीचें व वष्टाचें असतें व थोडाबहुत तरी रक्तपात झाल्यावांचून शांतता प्रस्थापित करितां येत नाहीं.

 ८. स्वतःचे घर -कुटुंब-यावर चिनी लोकांचे अत्यंत प्रेम असते. या- मुळे आपले घरदार सोडून लांब जाण्यास ते फार कचरतात. त्यांना नेहमी आपल्या माणसांत-मुलाबाळांत असावेंसें वाटतें. मृत्यु तर आपल्या घराहून अन्य ठिकाणी येऊच नये अशी त्यांची समजूत असते. प्रवा