पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ५ वा.

४७

१६:१२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१२, ६ डिसेंबर २०२३ (IST)

अमलांत असून तेथील कुटुंबांची सामाजिक स्थिति आमच्याकडील अविभक्त कुटुंबांतील सामाजिक स्थितीप्रमाणेच असते. बाप वारल्यावांचून मुलांनां विभक्त होतां येत नाहीं. एखादा मुलगा अगर कुटुंबांतील दुसरा कोणी पुरुष अगदी वाईट चालीचा अगर व्यसनी निघाला तर त्याला कायमचा बहि- कार घालण्यांत येतो व पुढे त्याची दुर्दशा होऊन त्यास फार वाईट स्थितीत मरण येते. सुदैवाने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे प्रसंग फारच थोड्या कुटुंबांवर येतात. चिनी लोकांत बहुभार्यत्वाची चाल आहे. परंतु पहिल्या बायकोलाच विशेष महत्व असतें. तिला जरी पोरबाळ झालें नाहीं तरी तिचे कुटुंबांतील महत्व कमी होत नाहीं. एकंदरीने पाहतां चिनी लोकांची कौटुंबिक व्यवस्था त्यांनां फारच सुखकारक वाटते व जेव्हां एखादा पुरुष सरकारी नोकरीच्या निमित्तानें आपलें घर सोडून दूरच्या प्रांतांत जाण्यास निघतो तेव्हां त्याला मनापासून दुःख होत असतें.

 ९. चिनी लोक एकंदरीत फार कृतज्ञ आहेत; तसेच ते मोठे प्रेमळ व स्नेहाकरितां जिवास जीव देणारे आहेत. पण या सद्गुणांबरोबरच त्यांचे अंगीं खुनशीपणाचा दोषही असलेला आढळून येतो. ज्याला त्यांनी एकद आपला शत्रू मानलें त्याचा दीर्घद्वेष करण्यांत व त्याचा सूड उगविण्यांत त्यांची बरोबरी इतर कोणत्याही मानवसमाजास करतां येणार नाहीं ! त्यांच्या ह्या मनोवृत्ति अत्यंत जाज्वल्य असतात.

 १०. चिनी लोक अत्यंत उद्योगी आहेत; परंतु त्यांच्यापैकीं कांहीं लोकांस वेळाची फारशी किंमत वाटत नाहीं असें ह्मणतात. हे लोक जर कांहीं कामानिमित्त कोणास भेटावयास गेले तर काम आटोपले तरी सुद्धां - खुशाल रेंगाळत बसलेले असतात. मग त्या घरांतील माणसाने जेव्हां यांना जाण्याचा इषारा करावा तेव्हां ते मोठ्या खेदाने तेथून हालतात.

 ११. चिनी वर्ष चांद्रमानाचें असतें व दर २ || वर्षांनी त्यांत एक 'अधिक' महिना येत असतो. चिनी पंचांग सरकारी रीतीनें दरवर्षी पेकींग येथे प्रसिद्ध होत असतें व त्यांत, शुभाशुभ दिवस, सणाचे व बादशहांच्या मृत्युतिथींचे दिवस ठळकपणे दर्शविलेले असतात. ह्या मृत्युतिथींचे दिवशी सर्व सरकारी कचेऱ्या बंद असतात. या दिवशी मोठमोठ्या अधिकान्यांची