पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/53

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
चीनची संक्षिप्त माहिती.

१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

पिछाडीच्या दरवाजानें जाऊन घ्यावी लागते. ह्या दिवशीं पुढील दरवाजा बंद असतो व तो कोणत्याही सबबीवरून उघडला जात नाहीं.

 १२. चिनी लोकांत शिष्टाचाराचें महात्म्य फार आहे. त्याविरुद्ध कोणी बर्तन केल्यास ते लोक तत्काल क्रुद्ध होतात. घरीं, दारीं, रस्त्यावर - सर्वत्र शिष्टाचारांच्या नियमांचें कोणाकडूनही उल्लंघन होता कामा नये, अशी त्यांची दृढ समजूत असते. त्यांच्या शिष्टाचारांपैकी मासल्याकरितां कांही थोडे पुढे सांगतों:-

 रस्त्यांतून एखादा मनुष्य रिकामा चालला असतां मागून जर पाण्याची कावड घेऊन अगर अन्य ओझे घेऊन कोणी आला तर त्या रिकाम्या माण- सानें तत्काल बाजूस होऊन त्या ओझे वहाणारास रस्ता मोकळा करून दिला पाहिजे. पायी चालणाराने मेण्याच्या भारवाहकांस व त्यांनीं घोडेस्वारांस तसेंच या सर्वांनीं एखाद्या लग्नाच्या अगर अधिकान्याच्या मिरवणुकीस रस्ता मोकळा करून द्यावा लागतो. तसेंच रस्त्यांत एखादा हमाल अगर फेरीवाला दमून मधेच आपले ओझे टाकून विश्रांति घेत बसला तर जाणारयेिणारांनी त्याला त्रास न देतां त्यास वळसा घालून निघून जावें असा प्रघात आहे. त्याप्रमाणेंच चिनी रस्त्याच्या आजूबाजूला जागा सांपडेल तेथें जर कोणी व्यापाऱ्याने तात्पुरतें दुकान मांडलें तर त्याच्या वाटेसही कोणी जातां कामा नये. परंतु, या नियमामुळे रस्त्यावर माणसांची दाटी होऊन गडबड व अव्यवस्था माजण्याचा संभव असतो. तथापि त्याचा त्या लोकांस फारसा विधिनिषेध नसतो. चिनी मनुष्यास कोणी भेटावयाला आला असतां त्यानें आपल्या जागेवरून उठून त्याचे स्वागत केलें पाहिजे व तो स्थानापन्न होई- पर्यंत आपण आपल्या स्थानावर बसतां कामा नये. तसेंच तो परत जाईल तेव्हां त्याच्या मागें राहून पुढे होतां कामा नये- दरवाजापर्यंत त्यास पोंच- विलें पाहिजे. पाहुण्याला नेहमीं डाव्या अंगास बसण्याची जागा करावी लागते. कारण डावी बाजू ही विशेष मानाची समजली जाते. या भेटींत स्त्रियांच्या नांवाचा नुसता उल्लेख सुद्धां कोणी करतां कामा नये. भेटीस येणारा पाहुणा स्थानापन्न होतांच त्याला एक पेलाभर चहा अर्पण करावयाचा असतो. त्यांत बिलकूल चूक होतां कामा नये. तो पेला देणारानें दोन्ही हातांनीं दिला पाहिजे व घेणारानेही दोन्ही हातांनी घेतला पाहिजे. एका