पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/54

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ५ वा.

४९

१६:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

हाताने देणे-घेणे असभ्यतेचें लक्षण मानलें गेलें आहे. हा चहा पिण्याचें काम मात्र मुलाखत पुरी झाल्यावर होत असतें. जर एखादे वेळी ही मुलाखत लवकर संपावी असें घरधन्यास वाटेल तर तो आपण होऊन चहाचा पेला हातीं घेऊन आपल्या पाहुण्यासही तो पिण्याचा इषारा करितो. तो इषारा मिळतांच पाहुण्यास त्या घरधन्याबरोबर चहा पिणे भाग पडतें आणि हूँ चहा- पान आटोपतांच त्या विचान्यास निघून जाण्याची तयारी करावी लागते. ह्या मुलाखतीच्या वेळी जर कोणी चष्मा लावलेला असला तर तो काढून घ्यावा लागतो. अलीकडे हा नियम मात्र शिथिल होत चालला आहे.

 १३. जर कोणास प्रामाणिकपणे वागून दारिद्र्य प्राप्त झालें असेल अगर मुळचेच असेल तर त्याचा चिनी समाजांत कधींही अवमान होत नाहीं. संपत्तीपेक्षां शीलाचे महत्व ह्या समाजांत विशेष मानले जाते.तसेंच विद्या- संपन्न पुरुषांचाही ह्या समाजांत फार गौरव होतो.


 १४. चिनी लोक लिहिलेल्या अगर छापलेल्या कागदास 'पवित्र' कागद समजतात. असले कागद पायाखाली तुडविणें, रस्त्यांत फेंकणे, अगर त्यांचे पुस्तकाला पुढे घालणें त्यांना आवडत नाहीं. ते कागद निरुपयोगी ठरल्यास त्यांचे तुकडे करून ते पेटलेल्या अनीत टाकणे मात्र त्यांनां मान्य आहे. कारण अनि हा पवित्र असल्यामुळे त्याच्या साह्यानें ते कागद पवित्र ठिकाणी जाऊन पोचतात अशी त्यांची समजूत असते. याकरितां चिनी रस्त्यावर कागद जाळण्याकरितां ठिकठिकाणीं सुरक्षित जागा व भट्टया केलेल्या असतात. बूट किंवा जोडे यांच्या कामी असल्या कागदांचा उपयोग करणें हें गुन्हा मानलेले आहे.

 १५. चिनी लोकांचा पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास असतो. व सामान्यतः हे लोक बरेच धर्मभोळेही असतात.

_________