पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
चीनची संक्षिप्त माहिती.

१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२०, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

संस्कृतीहून ही संस्कृति अगदी भिन्न असल्यामुळे व कित्येक बाबतीत तर ती चिनी लोकांस विपरीत वाटणारी असल्यामुळे ह्या दोन संस्कृतींच्या प्रव. तकांत अर्थात्च रणे माजू लागली. पाश्चात्य संस्कृतींतील काही व्यवहार्य व उपयुक्त भागाचे तरूण चिनी लोकांनी अवलंबन केल्यामुळे तर एकंदर राष्ट्रांत बरीच खळबळ उडून गेली आणि जुन्या व नव्या पंथांच्या लोकांत वाद माजून त्यांत अनेक पक्ष व उपपक्ष निर्माण झाले. आवेशाच्या भरांत हे पक्ष जरी आपापसांत भांडले तरी चिनी राष्ट्राचे कल्याण करण्याची बुद्धि सामान्यतः सर्वांच्या ठायीं सारखीच असल्यामुळे त्या भांडणांचा चिनी राष्ट्राच्या स्थितीवर कोणताही कायमचा अनिष्ट परिणाम घडून येणे शक्य नाही. उदाहरणार्थ डॉ० सन्यत्सेन व युयानशिकाई यांच्या कृत्यांचाच आपण थोडासा विचार करूं. हे दोन थोर पुरुष अनुक्रमें चीनमधील राष्ट्रीय व नेमस्त अथवा तरूण व जुन्या पिढीचे पुढारी आहेत. उभयतांमध्ये व त्यांच्या अनुयायांमध्ये इतका तीव्र मतभेद आहे की, राष्ट्रहिताकरितां परस्परांनां परस्परांची डोकी उडवावीशी वाटतात! परंतु दुर्दैवाने ह्यांपैकी कोणताही एक पक्ष जरी अंतःकलहाला बळी पडला तरी राष्ट्रीयदृष्टया चीनचे अक. ल्याण होण्याचा लेशमात्रही संभव नाही. जो पक्ष प्रबल होऊन टिकेल तो आपल्या कल्पनेप्रमाणे किती जरी वागला तरी लोकमतास मान देऊन त्याला चीनचा राष्ट्रीय दर्जा वाढविणे भागच आहे. आणि चीनमधील अंतःकलहाचें जो कोणी सूक्ष्म निरीक्षण करील त्यास असे स्पष्ट आढळून येईल की, हा सर्व कलह केवळ चीनचा राष्ट्रीय दर्जा वाढविण्याच्याच हेतूनें उपस्थित होऊन त्या अनुरोधानेच मुख्यतः चाललेला आहे. येथे अर्थात्च तेथील बारीक सारीक बंडाळीचा अगर लोकक्षोभाचा विचार केलेला नाही व अशा प्रकारच्या स्थूल विवेचनांत त्यांचा विचार करण्याचे काही प्रयोजनही नाही. येथें फक्त मुख्य मुख्य व ढोबळ गोष्टींचाच विचार कर्तव्य आहे.

 आणि त्यांचा विचार केला असता आह्मास तर असें खास वाटते की, ययानशिकायी व डा० सन्यत्सेन यांच्यामध्ये कितीही जरी तीव्र मतभेद असला तरी त्यामुळे चिनी राष्ट्रकार्याची हानी होण्याचा बिलकूल संभव नाही. या अंतःकलहामुळे व परराष्ट्रांच्या कैचीमुळे प्रस्तुत, युयानशिकाईचा मार्ग जरी कंटकमय झाला असला आणि त्याकरितां जरी काही काल तेथील