पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/58

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार.

५३

१६:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:२२, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

राजसत्तेचे केंद्रीकरण करण्याची त्यास आवश्यकता भासली असली तरी हे सर्व प्रसंग केवळ अगांतुक असून आळवावरच्या पाण्याप्रमाणे अगर ग्रीष्म ऋतूंतील गडगडणाऱ्या मेघाप्रमाणे होत. त्यांमुळे चिनी लोकसत्ताक राज्याला धक्का पोचण्याचा अगर तें नष्ट होण्याचा तिलमात्र संभव नाहीं. चिनी लोकां- मध्ये व्यक्तिस्वातंत्र्य व समता यांचे फार प्राचीन कालापासून वास्तव्य असल्या- मुळे राष्ट्रीय उदयाच्या त्यांच्या भावना अगदी स्पष्ट असून त्या सर्वांच्या अंगीं सारख्या मुरलेल्या आहेत. ऐक्यसंवर्धनाची कला तर त्यांना फारच चांगली अवगत आहे. जेव्हां जेव्हां त्यांच्या देशांत संप अगर बहिष्कार यांची चळवळ सुरु असते तेव्हां त्यांचें हें ऐक्यसंवर्धनाचे सामर्थ्य चांगले दृष्टीस पडते.

 आज सुमारे २२ शें वर्षेपर्यंत जे राष्ट्र वरील गुणांच्या जोरावर टिकाव धरून राहिले आहे त्याच गुणांवर श्रेष्ठत्व संपादन करणाऱ्या इतर राष्ट्रांनां यापुढें हार जाईल अथवा त्यांच्या मार्गे राहील असे अनुमान काढणे चुकीचे- धोक्याचें-होईल. गतशतकांत त्याला जी झोप लागली होती तींतून ते चालू शतकाच्या प्रारंभीं जागे होऊन कामास लागले आहे; आणि जोपर्यंत ते ह्या नागृतावस्थेत आहे तोपर्यंत त्याची पिछेहाट होण्याची मुळींच भोति नाहीं. उलट नवीन परिस्थितीस व कालास अनुसरून तें पुन्हां एकदां राजकीयदृष्ट्या जगांतील इतर बलाढ्य राष्ट्राच्या पंक्तीस जाऊन बसेल यांत शंका नाहीं. आमच्या ह्या मताच्या पुष्टिकरणार्थ चीन देशांतील स्थित्यंतरांचा विचारपूर्वक अभ्यास करणाऱ्या एका इंग्रज ग्रंथकाराचा एतत् प्रकरणी असलेला अभिप्राय नमूद करून आह्मी या विषयाची रजा घेतों. सदर ग्रंथकार ह्मणतो:-

 "The spirit of personal freedom seems to breathe through all Chinese institutions, and to unite the people in resistance to every form of oppression. The Chinese have always believed in the divine right of kings; on the other hand, their kings must bear themselvs as kings, and live up to their respou- sibilities as well as to the rights they claim. Other- wise, the obligation is at an end, and their snbjects