पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/7

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीनची संक्षिप्त माहिती.

प्रश्न प्रत्येक सुशिक्षित माणसाच्या मनांत उभा रहातोच. आणि या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळविणे असेल तर, चिनी लोकांची पूर्वपीठिका व त्यांचें राष्ट्रीय शील अथवा स्वभाव यांची थोडीशी तरी माहिती करून घेणें जरूर आहे. ज्यांनां ह्या गोष्टींची माहिती होईल त्यांनां चीनमध्ये घडून आलेल्या प्रस्तुत राज्यक्रांतीचे फारसे आश्चर्यही वाटणार नाहीं व त्यांत कांही अनभ्यस्त असा प्रकार घडला आहे, असेही त्यांस वाटणार नाही. जे कांहों घडून आलें आहे तें सर्वं त्या लोकांच्या परंपरेस - शीलास अनुसरूनच असून तॆ क्रांतीपेक्षां उत्क्रांतीच्याच मार्गाने घडून आलेले आहे अशी त्यांची विचा रांती पूर्ण खात्री होईल. व त्यांचे मन विस्मयाच्या वातावरणांतून निघून विचाराच्या कार्यकारणपरंपरा जाणण्याच्या वातावरणांत विहार करूं लागेल. हैं समाधान ह्या प्रांतांतील; केवळ मराठी वाचकांस प्राप्त करून द्यावे अशा हेतूनें प्रस्तुत लेखमाला लिहिण्याचे योजिलें आहे. *


 * वरील मजकूर लिहून बरेच दिवस झाल्यानंतर चीनमध्ये आणखी एक नवीन स्थित्यंतर झाले आहे. तें असें कीं, तेथील अध्यक्ष युयान शिकाई यानें लोकनियुक्त राजसभा बंद ठेवून तूर्त ७५ लोकप्रतिनिधींचे एक सल्लागार मंडळ नेमले आहे. परंतु त्याच्या ह्या कृत्यासंबंधानें निरनिराळ्या ठिकाणीं जी माहिती प्रसिद्ध झाली तिचा व खुद्द युयानशिकाई याच्या राजकीय धोरणाचा विचार करितां त्याने केलेली ही योजना चिनी लोकसत्ताक राज्याच्या इमारतीस बळकटी आणण्याकरितांच केलेली आहे, असे स्पष्ट कळून येण्यासारखे आहे. निदान प्रस्तुत लेखकाचे तरी तसें मत आहे. पर- कीय राष्ट्र चीनचे लचके तोडण्यास टपलेली, त्यांतच अंतस्थ शत्रूंनी भंडावून सोडलेले पाहून, कांहीं कालपर्यंत देशाचे भावी कल्याणाकरितां राजसत्तेच्या अधिकाराचे केंद्रीकरण करण्याचा जरी युयानशिकाई याने प्रयत्न केला, तरी त्यामुळे चिनी राष्ट्राची पिछेहाट होईल अगर तेथे पुन्हा एकतंत्री राज्यपद्धति स्थापन होईल, असें मानणे ह्मणजे युया नशिकाईच्या सद्हेतचा विपर्यास करणें होय. ज्या पुरुषाने इतक्या भयंकर अडचणीतून स्वदेशाचे रक्षण करून त्यांत शांतता राखिली व ज्याची राजकीय मातें कोकसत्तावादी आहेत, त्याच्या हातून चीनमध्ये महत्प्रयासाने स्थापन झालेल्या लोकसत्ताक राज्याची इतिश्री कधीही होणार नाहीं, हॅ युरोपियन लेखकांचे कावे जाणणाऱ्या लोकांस सांगावयास पाहिजे असें नाहीं.