पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/8

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक १ ला

१४:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:०९, ६ डिसेंबर २०२३ (IST)चंद्रकांत जाधव (चर्चा)

 ह्या लेखमालेत प्राचीन काळापासून तो प्रस्तुतची क्रांती होईपर्यंत चिनी समाजांत कोणकोणती स्थित्यंतरे झाली व त्यांमध्ये वेळोवेळी चिनी लोकांच्या अंगच्या कोणकोणत्या गुणांचें प्रदर्शन झालें हें संक्षिप्तरीतीनें सांगण्याचा आमचा विचार आहे. प्रस्तुत लेखांत चिनांतील देशस्थितीचे व लोकस्थितीचे सामान्य वर्णन देण्यांत येत आहे.

 १ इतिहास अगर भूगोल यांमध्ये चीन देशासंबंधीं जे उल्लेख केलेले असतात त्यांत 'चीनचं साम्राज्य हा शब्दसमुच्चय चीन देशास अनुलक्षून लाविलेला असतो. ह्या शब्दसमुच्चयामध्ये मंगोलिया, मांचुरिया, पूर्व तुर्कस्थान, तिबेट व चीनचे १८ परगणे इतक्या प्रदेशाचा समावेष होतो. व एके काळी हा सर्वं प्रदेश चिनी राष्ट्राच्या आधिसत्तेखाली होताद्दी. ( ह्यांतील कांही प्रदेश अद्यापही या आधिसत्तेखाली आहे. ) परंतु खुद्द चिनी लोकांचें ' वसतिस्थान ' व ' जन्मभूमी ' अथवा ' मातृभूमी' असें ज्यास ह्मणतां येईल तो प्रदेश ' चीनचे १८ परगणे ' हाच होय. हा भूप्रदेश विस्तारानें १५०,००० चौरस मैल आहे. उत्तरेस पेकिंग शहर ( राजधानी ), दक्षि- स कँटन शहर ( व्यापाराचे मुख्य मध्यवर्ती ठाणें ), पूर्वेस शांघाय शहर व पश्चिमेस तिबेटची सरहद्द याप्रमाणे स्थूलमानाने ह्या प्रदेशाच्या मर्यादा आहेत. त्यांत उत्तर व दक्षिण विभाग असे दोन मोठे भाग आहेत. उत्तर भागांतील हवापाणी समशीतोष्ण असे आहे. त्यांतल्या त्यांत पेकिंग शहरची हवा फार सुंदर आहे. ह्या भागांत मोठमोठी मैदानें असून त्यांवर मधून मधून गांव वसलेले आहेत. ह्या गावांतील घरें मातीचीं आहेत. दक्षिण भागांत डोंग- रांच्या अनेक रांगा असून त्यांतील सृष्टिसौंदर्य अवर्णनीय आहे. ह्या रांगां- तील उंच टेकड्यांवर जागोजाग मोठमोठे मठ बांधलेले आहेत. उन्हाळ्यांत येथे सुखवस्तु लोक नित्य हवा खाण्याकरितां येऊन रहात असतात. ह्या भागां- `तील हवा फार उष्ण आहे व त्यामुळे उन्हाळ्यांत टेकड्यांवरील ह्या मठांचा आश्रय करणें पुष्कळांस जरूरीचे व सोईचें वाटते हे मठ पुष्कळ आहेत. कँटन शहरानजीकच्या एका टेकडीवरच सुमारें १०० च्या वर असले मठ आहेत व तेथे पुष्कळ लोकांनां भाड्याने जागा घेऊन राहण्याची सोय मठाधि- पतींनीं केलेली आहे.

 किना-यावर राहणारे लोक उत्तर भागांतील व मध्यवस्तीतील लोकांपेक्षां अधिक हषार व चपळ आहेत. 'डोंगरापाशीं सद्गुण व पाण्यानजीक शहाणपण