पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/9

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)चंद्रकांत जाधव (चर्चा) १४:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)

अशी एक चिनी ह्मण आहे. त्यावरून कोठल्या भागांतील लोकांच्या अंगी कोणते गुण विशिष्ट असतात हे ध्वन्यर्थाने समजून येण्यासारखे आहे.

 उत्तर व दक्षिण ह्या दोन भागांतल्या लोकांमध्ये वारंवार कलह होत असतो. ते पुष्कळअशी परस्परांविषयीं उदासीन असल्याचेही दिसून येते. तथापि महत्वाची राष्ट्रीय हानि न होऊ देण्याबद्दल दोन्ही भागांतील लोक सारखेच सावध व दक्ष असतात.

 चीनची लोकसंख्या इ० स० १८४२ त ४० कोटींच्यावर होती असें एका परदेशी प्रवाशाच्या हकीगतीवरून दिसते चीन देशांत खानेसुमारी करण्याची पद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वांत आहे. इ० स० पूर्वी १५६ व्या वर्षी चीनची लोकसंख्या त्या वर्षांच्या खानेसुमारीत सुमारे ५० कोट आढळून आल्याचा दाखला सापडतो. त्यावरून खानेसुमारीचे शास्त्र चीन देशानें उसने घेतलेले नाही, ही गोष्ट निर्विवाद ठरते. त्या देशांत १९०२ साली जी खानेसुमारी झाली त्यांत ४० कोटी लोकसंख्या असल्याचे निदर्श- नास आले आहे.

 चिनी लोकांची ( १८ परगण्यांतील ) भाषा सकृत्दर्शनी एकाच तऱ्हेची दिसते. परंतु प्रांतिक भेदाभेदामुळे बोलण्याच्या प्रचारांतील भाषेचे कमीत कमी ८ भेद असलेले दिसून येतात. ह्या आठांपैकी प्रत्येक भेद उच्चार, रुढी, शब्द- योजना इत्यादि बाबतींत परस्परांहून भिन्न असा आहे. उदाहरणार्थ, शांघा यच्या मनुष्याची भाषा कँटनच्या मनुष्याच्या भाषेहून भिन्न असल्यामुळे परस्परांचं बोलणें परस्परांस ( त्या त्या भाषेतील ) स्पष्ट कळणे दुरापास्त होतें. मँडरिन नावाचा जो एक चिनी भाषेचा प्रकार आहे तो राजदरबारी चालू असल्यामुळे लोकव्यवहारांतही त्याचेच विशेष प्राबल्य आहे. अर्थात्, सर्व मोठमोठे व्यापारी, अधिकारी व बडे लोक हे त्याप्रकाराचे ज्ञान करून घेतात. आणि त्यामुळे व्यवहारांत त्यांचे कोठेही अडत नाहीं. बोलण्याच्या भाषेत जरी वरीलप्रमाणें ८ मुख्य भेद आहेत तरी लिहिण्याची भाषा सर्वांची सारखीच—एकच—आहे. निरनिराळ्या आकृतीच्या साह्याने चिनी अक्षरें बनलेलीं आहेत, हें सर्वत्र प्रसिद्धच आहे. सुमारे तीन हजार वर्षापासून अशा प्रकारची लेखनपद्धति चीनमध्ये चालू आहे.*


 * ह्या पद्धतीत नुकतीच सुधारणा करण्यांत येऊन अक्षरांची संख्याही पूर्वीपेक्षा कमी करण्यांत आली आहे.