पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ७३ यमक, यतेि, अक्षर आणि गण परन्तु या नियमालाहेि काही अपवाद असावेत अशी म्हणण्याची प्रवृत्ति केव्हा होते ? विप्र याचा झुचार निरपवादपणे विप्-प्र (– ७) असा होतो; पण हाच प्र जर ओखाद्या पदारम्भी आला तर तत्पूर्वील लघूस गुरुत्व यावें की नाही ? ज्ञान-प्रकाश हा शब्द [ – ५, ५ – '] असा झुच्चारावा की ज्ञानप्-प्रकाश [– – ७ – ७ । ] असा झुचारावा. दैनिक बोलीत तर याचा झुचार [ –, ७ - ७] ज्ञान्-प्रकाश असा होतो. तेव्हा पद्यांत ग्राह्य कोणता मानायचा हा प्रश्न आहे डोळ्यापुढे पद्यांतील झुदाहरण पाहिजे म्हणून पुढील झुदाहरण रचून पाहूं या. रवि-प्रकाश हा पडला भूवर, राविप्रकाशीं सुवर्णसुन्दर मुलांस या हिरवळीं क्रीडु द्या असो काळजी झुद्याची झुद्या छन्दोभङ्ग टाळायचा असला तर पहिल्या चरणांतील 'वि' हें दुसरें अक्षर लघुच ठेविलें पाहिजे; आणि तीव्र-प्रयत्नाने, हट्टाने तें लघुच ठेवायचे म्हणजे 'वि'च्या मागून किञ्चित् अडखडळल्यासारखें थाम्बून मग पुढील प्रचा झुच्चार अस्पष्ट निसरडा करावा लागतो.' असें न केलें तर दुस-या चरणांतील वि-प् यांच्या सहजसंयोगाप्रमाणे पहिल्या चरणांतहि संयोग होन, विप् असें होभून दुस-या अक्षराला गुरुत्व येतें. सलग, स्पष्ट आणि स्वाभाविक झुचाराला महत्व देणारा कवि पहिला चरण ‘पडे हा रविप्रकाश सुन्दर’ असा सुधारून घे औील. अॅका चरणांत अॅक नियम आणि दुस-या चरणांत दुसराच नियम असें निरङ्कुशत्व त्याला रुचवणार नाही. पद्यांत चरणांतील सारी अक्षरें सलग आणि स्पष्ट झुच्चारावयाचीं असतात. तेव्हा चरणांत कोठेहि संयुक्त वर्ण आला असला, आणि तो कानालाहि संयुक्त प्रतीत होत असला तर तत्पूर्वील लघु हा निरपवादपणे गुरु झाला पाहिजे. क्र, प्र अित्यादि संयुक्त वणींच्या प्रकरणीं सुद्धा अपवाद करण्यांत ये नये १. यालाच तीव्रप्रयत्नोच्चारण म्हणतात. “यदा तीव्रप्रयत्नेन संयोगादेरगौरवम् । नच्छन्दोभङ्ग अित्याहुस्तदा दोषाय सूरयः” (सरस्वतीकण्ठाभरणं १॥१२३) या वचनाला फार महत्व देतां कामा नये.
पान:छन्दोरचना.djvu/१००
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही