पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने अध्याय २ रा यमक, यति, अक्षर आणि गण १ यमकविचार पद्यरचना ही अॅकप्रकारच्या आवृत्तीवर अधिष्ठित आहे. पद्यांत ओका चरणा सारखे अितर चरण असतात, अथवा चरणांतच काही ठराविक मात्रांच्या गणाच सारखी आवृत्ति असते. या आवृत्तीची सहज आणि स्पष्ट जाणीव व्हावी म्हणून विवक्षित ठिकाणीं, म्हणजे चरणान्त वा चरणारम्भ, गणान्त वा गणारम्भ य ठिकाझीं कवी काही आवृत्तिमूलक चमत्कार करून दरारखावतात. यालाच पद् लालित्य म्हणतात. पदलालित्य हें व्यञ्जनावृत्ति, अक्षरावृत्ति आणि यमक थ तीन गोष्टीनी येतें आवृत्ति ही ओका-च व्यञ्जनाची आणि अॅकदाच अशी असल्यास ती समा सांत पदारम्भ साधिल्याने तत्काळ प्रतीत होते; जसें कृष्णाकुमारी, तारातरङ्ग. ओकाच व्यञ्जनाची आवृत्ति अनेकदा साधायची झाल्यास ती क्रमाने शब्दांच्या आरम्भ साधिल्याने लौकर डोळ्यांत भरते जसें,
- पल्यङ्कावरि पडला पाण्डुपृथपुत्र पावला पडा,
वैराविजित विक्षतवपु विमुखत्वें वीरवर वरी त्रीडा.”(मोरोपन्त) व्यञ्जनाची बहुवार आवृत्ति करण यालाच अनुप्रास म्हणतात . आवृत्ति ही अनेकव्यञ्जनांची वा अक्षरांची असल्यास ती अॅकदाच झाली तरी रमणीयपणे जाणवते; मात्र ती यथाक्रम पाहिजे. जेथे अनेक गोष्टींचा अनेक गोष्टींशीं सम्बन्ध येतो तेथे क्रम अवश्य आहे. अक्रम हा दोष होतो
- न रन्जे कारन्जें निरखुनि, फणीने फणफणी,
मुदेने मोदेना नलगुणगणीं जे गुणगुणी, न बैसे जे सेजेवरि, न परिसे जे शुकगिरा, न नाहे, माना हे न धरि ललना हेतु दुसरा.” (दस्व १४६) या रघुनाथ पण्डिताच्या श्लोकांत मुदेने-मोदेना हें झुदाहरण अनेकव्यञ्जना वृत्तीचे आहे