पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४९ यमक, याति, अक्षर आणि गण अनेकाक्षरावृत्ति आणि यमक वरील लोकांतील अितर झुदाहरणे ‘न रन्जे कारन्जें'सारखीं अनेकाक्षरावृत्तीचीं आहेत. संस्कृतांत या अनेकाक्षरावृत्तीला यमक म्हणतात; आणि ही अनेकाक्षरा वृत्ति अनेक ठिकाणीं योजितात. पुढील पद्यांत ती चरणविभागांच्या आरम्भीं योजिलेली आहे
- छाया-नायकसा निदाघसमयीं छाया करी तो विधू ,
वाया या हृदयश्रमास करती दायादसा हा मधू, जाया ते रुचली मनीं तिजकडे जाया नये कीं पहा, रायाला न गमे, न जाय रजनी, आयास होती महा.”(दस्व २८) येथे पहिल्या चरणांत * छाया ' या दोन अक्षरांची आवृत्ति आहे; परन्तु तिस-या चरणांतील * जाया ' या दोन अक्षरांची आवृत्ति ही केवळ दिसायला आहे. पहिला जकार तालव्य आहे तर दुसरा जकार दन्ततालव्य आहे. तेव्हा सूक्ष्मपणाने पहातां जाया-जाया या जोडींतील आवृत्ति ही * वाया-दाया, राया-आया' या जोड्यांतील आवृत्तीप्रमाणेच झुपान्त्यस्वर आणि अन्त्याक्षर यांची म्हणजे * अा-या'ची आहे. मराठींत याला, म्हणजे अॅक स्वर आणि पुढील व्यञ्जन, वा अक्षर वा अक्षरें। यांची आवृत्ति साधणे याला यमक म्हणतात. आवृत्ति अनेकाक्षरांची असली म्हणजे त्या अक्षरांच्या पूर्वील स्वराचीहि आवृत्ति साधली आहे की नाही अिकडे लक्ष्य फारसें जात नाही; परन्तु आवृत्ति ओकाच अक्षराची असली तर मात्र त्याच्या पूर्वील स्वराची आवृत्ति पाहिजेच असें वाटतें. केवल अक्षरावृत्तीहून भिन्न असें हें यमक पूर्वी अगदी ठा भूक नव्हतं असें नाही. साहित्यदर्पणकार या यमकाला अन्त्यानुप्रास म्हणतो;
- व्यञ्जनं चेद्यथावस्थं सहाद्येन स्वरेण तु
आवर्तते ऽन्त्ययोज्यत्वादन्त्यानुप्रास ओव तत्” (साद १०६) या अन्त्यानुप्रासाचें झुदाहरण म्हणून तो पुढील चतुष्पदी देतो
- केशः काशस्तबकविकास
कायः प्रकाटतकरभावलासः