पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने ५२
- अप्पा गुरु णवि सेिस्सु णवि
गणवि सामिश्रु णवि भिच्चु सूरश्रु कायरु होअि णवि णवि श्रुत्तमु णवि निच्चु” (पप्र ९०) यमकाचें याहूनहि प्राचीन झुदाहरण आढळतें. कुन्दकुन्दाचायांच्या नावावर चालत आलेलीं प्राकृत गुरुभक्तीचीं पद्ये परमात्मप्रकाशाहून निःसंशय प्राचीन आहेत. ह्रीं पद्ये सयमक आहेत. पहिली चतुष्पदी पहाः “मणुयणाअिन्दसुर धरिय छत्तत्तया ते जिणा दिन्तु अम्हं वरं मङ्गलं' (प्रागुभ १) यमकाविषयी तीव्र मतभेद कां ? यमकाचा काही झुपयोग आहे का ? कवि रेन्दाळकर यांनी जेव्हा यमका विरुद्ध बण्ड पुकारिलें तेव्हा निकराचीं वाग्युद्धे झाली.
- टला ट ग पला प
काव्य बने आपोआप ” असें प्रतिपादन करणारे यमकाभिनिवेशी वीर प्रतिपक्षावर कर्तृत्वशून्यतेचा आरोप करीत आणि म्हणत की *छन्दयाति आह्वादयाति अिति छन्दः' हें जर खरें असेल तर रसिकाच्या कानाला नेि मनाला आल्हाद देणारें आणि कवीच्या कल्पनेला चालना देणारें यमक हें काढून टाकणे म्हणजे काव्याला शुष्क गद्याच्या पायरीला झुतरवून बसविण्यासारखें होय. झुलटपक्षीं यमकत्यागी लोक संस्कृत काव्यपरम्परेचें झुदाहरण पुढे करून प्रतिपक्षावर सनातन स्वधर्म सोडल्याचा आणि तोतयालाच राज्यासनावर बसविल्याचा आरोप करीत. त्यांचें म्हणणे असें की भावनेचें सङ्क्रामण हा काव्याचा आद्य हेतु होय. यमक हा निवळ अॅक दागिना आहे. सालङ्कृत कलेवर नको; अनलङ्कृत परन्तु सुन्दर