पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने धामाधिपान्वयवरा, मानशौर्यसुभगा, मानिषेव्यचरणा, वामाकृते, अितरवामापराङ्मुखमना, मानवैकशरणा.” (मोकुल १३॥३०) या श्लोकांत * आमा'ची आवृत्ति साधिली परन्तु ती स्पष्टपणे प्रतीत होत नाही यासाठी यमकान्तीं पदसमाप्ति होणे अवश्य आहे. चरणान्तर्गत यमकावलीमुळे कित्येकदा वृत्ताची वा जातीची मोडणी कळा यला साह्य होतें. झुदाहरणार्थ, सोळा गुरु अक्षरांच्या ब्रह्मरूपक नावाच्या वृत्ताचे वाणीभूषणांतील
- राजद्भालः स्फूर्जन्नेत्रप्रोद्यद्वाह्निज्वालाजालैः
स्व...त्यम्भोवीचीनीरासारस्विद्यचूडाचन्द्रः । माद्यौरीवक्त्राम्भोजस्वैरस्मैरक्रीडाशीतः श्रेयो देयान्नागश्रेणीभूषामीषश्चन्द्रापीडः” (वाभू २॥१८२) हें झुदाहरण पाहतां वृत्ताची मोडणी [। - । – – – -] अशी वाटते; परन्तु ज्या प्राकृतपैङ्गलावर वाणीभूषण आधारलेलें आहे त्यांतील * झुम्मत्ता जोहा झुठे कोहा ओोत्थाओोत्थी जुज्झन्ता मेणक्का रम्भा णाहं दम्भा अप्पाअप्पी बुज्झन्ता धावन्ता सण्ठा छिणो कण्ठा मत्था पिट्टी पेरन्ता णं सग्गा मग्गा जाओ लग्गा लुद्धा झुद्धा हेरन्ता' (प्रापै २॥१७५) हें झुदाहरण पहातां वृत्ताची मोडणी [ –। – – – – | – – – –। – – – –। । -] अशी पाहिजे हें निश्चित होतें चरणान्तीं यमक साधितात म्हणून तेवढ्याने यमक हें चरणसमाप्तीचे गमक होत नाही. कित्येकदा लागोपाठ दोन आवर्तनान्तीं यमक साधतात; कित्येकदा तें ओका चरणांत साधतात आणि दुस-या चरणांत साधीत नाहीत. तेथे यमक हें केवळ पदलालित्याचें अॅक अङ्ग असतें
- मुखरमधीरं त्यज मञ्जीरं रिपुमिव केलिसुलोलम्
चल सखि कुञ्ज सतिमिरपुञ्ज शीलय नीलनिचोलम्” (गीगो ११॥४)