या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने मराठींतील यमकोपयोगाचा ऑितिहास मूराठीत चरणान्य यमक हें अपभ्रंशवाङ्मयाच्या द्वारा आलें असलें पाहिजे. तथापि मराठीतील आद्य वृत्तात्मक रचना, भास्करकविकृत * श्रीशस्तुति ' ही निर्यमक आहे. तेराव्या शतकाच्या शेवटीं शेवटीं सयमक रचनेचा पाठच पडला परन्तु अनेकदा शुद्ध यमकाचें काम केवळ अक्षरावृत्तीवर भागवून घेण्यांत येऊऔी ओवीरचनंत असें सदोष यमक आहे. अॅकनाथाचवीं पर्दे सयमक आहेत. मुक्त श्वराच्या रामायणाची वृत्तरचना ही सयमकच आहे. वामनापासून यमकाला विशेष महत्व येश्रू लागले; तो निर्वाळा असा देतो कीं,

  • श्लोकवृत्त काथिलें यमकांनी

गाति त्यांस न पडे यम कानीं' (वाभारा १॥३०) त्याच्या चमत्कृतिजनक थोर कामगिरीमुळेच त्याचे नाव 'यमक्या' पडलें मोरोपन्ताच्या कृतींत या चमत्कृतीचा कळस झाला. चरणान्तीं शक्य तितक्या अक्षरांची यमकें तर त्याने साधिलींच, पण साहित्यकारांनी शब्दालङ्कारप्रकरणीं जितक्या प्रकारचीं यमकें साङ्गितली आहेत तितक्या प्रकारची जुळवून मोरोपन्ताने वाचकांचे डोळे दिपवून टाकिले, त्यांची मति भ्रान्त करून टाकिली. तथापि त्याचें भगवद्भीतेचे भाषान्तर निर्यमक गीतींत आहे हें विसरतां कामा नये. जातिरचनेला यमक हें प्राचीनकाळापासून आवश्यक वाटत आले आहे. आधुनिक मराठी कवींत घण्टया नायडू यांनी आपलें अॅक दीर्घ काव्य निर्यमक लिहिलें असले तरी निर्यमक कवितेची चळवळ अॅकनाथ पाण्डुरङ्ग रेन्दाळकर यांनीच केली. रा. ओकनाथ यादव निफाडकर यांचें *सतीचा शाप' हें दीर्घ जातिस्वरूप काव्य निर्यमकच आहे. तरी आधुनिक मराठी कविता ही प्रायः सयमकच आहे. शक्य तितक्या अक्षरांचीं यमकें हट्टाने जुळवीत बसण्यांत बुद्धीचा व्यय मात्र कचितच कोणी कवि करीत असेल. यमक अॅकाक्षरी असलें तरी धकतें. ओकाक्षरी यमक जुळविणे हें पद्यरचनेहून अधिक दुष्कर वा कृत्रिम सुतराम् नाही. तथापि रेन्दाळकरांच्या मागून निर्यमक कवितेचा पुरस्कार करण्याची आवश्यकता अलीकडे पूर्व महाराष्ट्रांतील कवींना वाटू लागली आहे. त्यांच्यापैकी काही जणांना तर लयबद्धताहेि जाचक होते. त्यांनी यमकाची प्रतिष्ठा कां ठेवावी ?