पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने शैलशिखा, वितथ, वरयुवती, वंशदल, भ्रमदपद, युवाणिनी, वाणिनी, वीर ललिता, समदविलासिनी, गरुडरुत, नन्दन, नरेन्द्र, कामलता, शशिवदना, भद्रक अश्ललित, ललितविक्रम आणि सुधाकलश' या पञ्चवीस वृत्तांची परस्पराशी तुलना करून पहातां हीं अष्टमात्रक आवर्तनाचीं आहेत, पहिला गण ( – ७ ७ –) वा (७ ७ ७ ७ –) असा षण्मात्रक आहे, आणि पुढील गाणांत ( ५ - ७ ७ ५ -) या गणाचें प्राचुर्य आहे हें ध्यानांत यायला वेळ लागत नाही. आता पिङ्गलाने साङ्गितलेल्या वृत्तांपुरताच विचार केला तर असें दिसून येतें की वंशपत्रपति (वंशदल), शशिवदना, भद्रक आणि अश्वललित या चार वृत्तांत तो द्वितीय आवर्तनाच्या अन्तीं यति साङ्गतो; पण नवमालिनी, ऋषभगजविलासित शैलाशखा, अवितथ आणि वरयुवती या वृत्तांत तो द्वितीय आवर्तनाच्या अन्तीं यति साङ्गात नाही. वरयुवती आणि वंशपत्रपतित या दोन वृत्तांत विलक्षण साम्य आहे; पण अॅका वृत्तांत तो यति योग्य ठिकाणीं साङ्गतो तर दुस-या वृत्तांत तो यतिच्च साङ्गत नाही! अॅकन्दरीने विचार करितां नवमालिनी, ऋषभगजविलसित, शैलशिखा, कोकिलक या वृत्तांत पिङ्गलाने साङ्गितलेलीं यातिस्थानें चुकीची वाटतात. अष्टमात्रक आवर्तनाच्या वृत्तांत जेथे चरणांत चार आवर्तने असतात तेथे दुस-या आवर्तनाच्या अन्तीं खटका अगदी स्वाभावि कपणे येतो. तेथे अॅका मात्रेचाहेि विराम नसतो, तथापि तें यतिस्थान होतें आणि तेथे पदसमाप्ति अवश्य वाटते. जेथे केवळ खटका आहे तें जर यतिस्थान मानार्वे लागतें तर जेथे दोन मात्रांचा विराम आहे तें यतिस्थान मानलेच पाहिजे हें झुघड आहे. पहिल्या आवर्तनांत सशब्द सहा मात्रा झाल्यावर दोन निःशब्द मात्रांचा विराम घेतल्याविना नवीन आवर्तनाला आरम्भ हो# शकत नाही. म्हणून या सर्व वृत्तांत ( ) वा ( ) वा ( या पहिल्या गणाच्या अन्तीं द्विमात्रक विराम असल्याने तेथे यति मानणे अपरिहार्य आहे १ यांच्या व्यतिरिक्त याच प्रकारचीं आणखी काही वृत्तें आहेत. त्यांची ठाश्रुकी छन्दःशास्त्रज्ञांस नाही; पण त्यांचीं झुदाहरणें वाङमयांत सापडतात. त्यांचीं झुडुपथ सुरासुरवन्द्य, त्रिदशाङ्गना अशी नावें झुदाहरणांतील शब्दांवरून मी ठेविलीं आहेत. विस्तारभयास्तव तीं येथे दिलीं नाहीत
पान:छन्दोरचना.djvu/९३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही