पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना \9. यांत नवल नाही. परन्तु ऋ आणि ल हे स्वर आहेत असें मानणारे हेच कवि-श्री० नरसिंह चिन्तामण केळकर जेव्हा सहजगत्या शार्दूलविक्रीडितांत ‘देअीं धीर मनासि आजवरि मी, झाले प्रयत्न वृथा ” (केपगु ६९) ' असा चरण लिहितात तेव्हा ऋकारयुक्त अक्षरापूर्वील लघु गुरु व्हायला पाहिजे ऋकारयुक्त व्यञ्जनापूर्वील लघूस गुरुत्व आर्लेच पाहिजे. ** प्रवृत्ति परिसूनिया स्तिमित सर्वही मानसीं” (लेति २) या पृथ्वीवृत्तांतील चरणांतील प्रवृति या शब्दाचा झुचार आणि *निवृत्ती ही प्रवृत्तीशी झुन्जे नित्य विलोकी” (टिक १॥१२४) या साकीजातींतील चरणांतील प्रवृत्ति या शब्दाचा झुचाराच्या दृष्टीने टिळकांचाच चरण शुद्ध वाटतो. हृचा अपवाद होतो का ? मग सहृदय या शब्दामध्ये प्रथमाक्षर गुरु कां होॐ नये ? हे मध्ये संयुक्त व्यञ्जन नाही हैंच कारण होय. संस्कृतलेखनपद्धतीप्रमाणे हृ हें अक्षर लिहिलें जात असलें तरी श्रुचरतः तें हृ++अ (hro) असें नसून व्ह+अ rho असें आहे. म्हणजे -हू मध्ये ओक विशिष्ट स्वर मिळून हें अक्षर होतें. अर्थात् 'त-हा’ मध्ये ज्याप्रमाणे प्रथमाक्षराला गुरुत्व येत नाही, त्याचप्रमाणे 'सहृदय? मध्ये प्रथमाक्षराला गुरुत्व येत नाही. स्वरभक्ति ज्या संयुक्त वर्णात पहिला वर्ण आहे अशा संयुक्त वर्णाची फाळणी वृत्ताच्या सोयीसाठी मध्ये ओखादा अिकार घालून प्राचीन संस्कृत काव्यांत करण्यांत येते असे दिसतें.
- यं वै श्वसन्तमनु विश्वसृजः श्वसन्ति यं चेकितानमनु चित्तय झुचकन्ति
तस्मै नमो भगवतेऽस्तु सहस्रमूर्ध्न ” ( भाग ६॥१६॥४८)