पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना <ー (७) कडून, कून, पासून, पून. (८) खाली, खालें, खालति, खालती, खालील, खालला. (९) जर, जरि, जरी, तर, तरि, तरी, परि, परी, परीस, (१०) झणी, लवलाही, लौकरी, झडकरी, सत्वरी. (११) नाही, नहि. ( ११ ) नित्य, नित. (१२) पलीकडे, पल्याड, पैलीकडे, पैलाड. (१३) पुढे, पुढं, पुढारीं, पुढारां, पुढतें, पुढील, पुढला. ( १४) भवती, भवतें, भवताली, भोवतां, भौंवर्ती, भोंवतें, भोवताली, सभोवती, सभोंवताली. ( १५) मग, मा. (१६) मध्ये, मधे, मधि, मधी, माजि, माजी, माझारी, भीतरीं. ( १७) मागे, माग, मागुती, मागून, माघारा, मागील, मागला. ( १८) वर, वारि, वरी, वरति, वरती, वरर्ते, वरील, वरली. (१९) विना, विणें, वीण. निरङ्कुशत्वाच्या या ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्या पाहतां त्यांत ओकसूत्रीपणा नाही हें झुघड आहे. पण हा दोष व्यक्तिशः कवीचा वा भाषेचा नसून मूलभूत मनुष्यस्वभावाचा आहे. व्यक्तींतसुद्धा जर आत्यन्तिक ओकसूत्रीपणा आढळत नाही तर अशा कोट्यवधि व्यक्तींची मिळून जी भाषा तिच्यांत त्याची अपेक्षा करणें चुकीचें आहे. मनुष्य ओकीकडे ओकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न करितो तर दुसरीकडे जें चिरपरिचयाचें रूढ आहे तें त्याला सोडवत नाही. तेव्हा विसङ्गति आणि तडजोड हीं या मूलभूत द्वैताचींच फळे आहेत. शुद्ध संस्कृत शब्दांचे प्रयोग संस्कृत व्याकरणास अनुसरून करावेत असें ठरबून दारा, समाधि अित्यादि शब्द पुलिङ्गी वापरले तर तें हास्यास्पद पाण्डित्य होतें; बरें, मराठी व्याकरणाचे नियम यत्र्चयावत् सर्व शब्दांना लावावेत असें ठरबून, ‘आधुनीक', 'विवीध' 'प्रितीला' अशों रूपें लिहूं लागलों तर तो निरर्गल सुधारकपणा होतो; आणि डोळ्यापुढे नकोसा वाटतो तरी सुधारणेची दिशा ठरली की त्या दिशेने थोडीफार प्रगति करीत रहावें हें युक्त होय.
पान:छन्दोरचना.djvu/113
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही