पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ORS वृत्तविचार वृतें अनावर्तनी असोत वा आवर्तनी असोत, कवीना जाँ वृत्तें सलग नि दीर्घ रचनेला अनुकूल अशीं वाटलीं आणि जीं त्यामुळे रूढ झालीं अशा वृत्तांची सङ्ख्या चाळीसाच्या वर जात नाही. अनावर्तनी वृत्तांपैकी अिन्द्रवज्रा, झुपेन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, रुचिरा, प्रहर्षिणी, रथोद्धता, स्वागता, प्रमिताक्षरा, द्रुतविलम्बित, वसन्ततिलका, शालिनी, मालिनी, मन्दाक्रान्ता, स्रग्धरा, शार्दूलविक्रीडित, हारिणी, शिखरिणी, सुवदना आणि पृथ्वीहीं वृतें विशेष रूढ दिसतात. या वीस वृत्तांपैकी अिन्द्रवंशा हें वृत्त संस्कृतांत वैरल्यानें आढळतें. रुचिरा, प्रहर्षिणी, प्रमिताक्षरा नि सुवदना पद्मावर्तनी वृत्तांपैकी तोटक, विद्युन्माला, दोधक, जलोद्धतगति, जलधरमाला, मत्तमयूर, मदिरा, हंसगति आणि हेमकला हीं नक्षू वृतें रूढ दिसतात. अग्न्यावर्तनी वृत्तांपैकी विबुधप्रिया आणि सुरनिम्नगा हीं रूढ दिसतात. भूड्गावर्तनी वृत्तांत प्रमाणिका हें फार प्राचीन काळापासून रूढ दिसतें. कलिन्दनन्दनी आणि देवराज हीं झुशीराने रूढ झालीं आहेत; पण यांच्या मिश्रणामुळे होणारी शिथिल रचना ललितविस्तरांत आढळते. हरावर्तनी वृत्तांपैकी भुजङ्गप्रयात आणि स्रग्विणी हीं प्राचीन दिसतात; मन्दारमाला आणि अमृतध्वाने हीं झुशीराने रूढ झालीं आहेत. अर्धसमवृत्तांपैकी संस्कृतांत अपरवक्त्र, पुष्पिताग्रा, वियोगिनी आणि मालभारिणी हीं चारच रूढ दिसतात. मराठींत वियोगिनी आणि मालभारिणी हीं दोनच विशेष परिचित आहेत. अशों हीं अनावर्तनी वृत्तें मूल कशीं अत्पन्न झालों असतील ? छन्दःशास्त्र अत्पन्न होण्यापूर्वी कवींनी जी रचना मनोगत आन्दोलनानुसार केली असेल ती अपरिहार्यपणें शिथिल झाली असलीच पाहिजे. अशी शिथिल रचना ललितविस्तरांत विपुल पहायला मिळते. अशा शिथिल रचनेंतूनच पृथक्करण, तुलना नि वर्गीकरण यांच्या साह्याने निश्चित स्वरूपाची पद्यरचना निघते. पिङ्गलभरतादि प्राचीन छन्दःशास्त्रकारांनी ज्या सामग्रीवरून हें शास्त्र राचिलें ती सामग्री त्यांनी आपल्या ग्रन्थांत जतन करून न ठेविल्यामुळे वृत्तोत्पत्तीचा अत्यन्त कुतूहल S. vs
पान:छन्दोरचना.djvu/124
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही