पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Qe जनक प्रश्न हा तितकाच कृष्ट होॠन बसला आहे. अिन्द्रवज्रा, झुपेन्द्रवज्रा. शालिनी, वातोर्मि, वंशस्थ, रुचिरा अित्यादि वृतें प्राचीन त्रिष्टुभूजगतींपासून निघालीं हें श्रुघड आहे. परन्तु वसन्ततिलका, मन्दाक्रान्ता, शार्दूलविक्रीडित, हरिणी, शिखरिणी, पृथ्वी हीं कशों कशीं परिणत होत आलीं याविषयी अटकळ करायलाहि आता काही मार्ग नाही. आवर्तनी वृतें हीं प्राकृत गेय जातिरचनेपासून नियमित करण्यांत आलीं असावींत. गेय जातिरचना ही आन्दोलन मनांत मुरल्यावर जितकी सुकर असते तितकीच, तिचें नियमन ओळखून तें दृग्गोचरकरून द्यायला कठिण असते. जातिरचना करायला कवि थोडा श्रुतिसिद्ध असावा लागतो. झुलटपक्षीं वृत्त हें रचायला कठिण असलें तरी अक्षरांची सङ्ख्या आणि लगक्रम यांनी बद्ध असलेलें त्याचें स्वरूप सहज आणि स्पष्टपणें ध्यानांत राहतें. अक्षरसङ्ख्या नि लगक्रम यांच्या दृष्टीने जातिरचनेकडे पाहिलें तर कोणतेच दोन चरण ओकसारखे दिसत नाहीत; त्यांतील साम्य सूक्ष्म असतें; चरणांचे काही विभाग मात्र अनिच्छया ओकसारखे येॲ शकतात. हें पाहून, जातीचें मूळ स्वरूप ध्यानांत न आल्यामुळेच की काय, ज्यांत चरणाचा काही भाग अचल आणि काही भाग चल असतो असा पद्यप्रकार छन्दःशास्त्रकारांनी कल्पिला असावा. वैतालीय, औपच्छन्दसिक, गीति, आणि आर्यगीते ही रचना या प्रकारांतील आहे. अशा गेय जातिरचनेंत जेथे अहेतुकपणें चारी चरण लगक्रमदृष्टया सारखे आले असतील तेथे छन्दःशास्त्रकारांनी स्वाभाविकपणेंच स्वतन्त्र वृत्त कल्पिलें असेल. परन्तु ओका चरणासारखे चार चरण लगक्रमदृष्ट्या असावेत या हेतूने केव्हा केव्हा कवींनी तर केव्हा केव्हा छन्दःशास्त्रकारांनी भिन्न भिन्न वृतें सिद्ध करण्याचा प्रयत्न बुद्धयाहि केला असेल. छन्दःशास्त्रकारांनी दिलेल्या झुदाहरणांव्यतिरिक्त स्वतन्त्र काव्यरचनेंत फारच थोड्या आवर्तनी वृत्तांचीं झुदाहरणें आढळतात. झुलटपक्षीं वाङायांत वृत्तस्वरूप चतुष्पद्या आढळतात त्यांची वातहि छन्दःशास्त्रकारांना लागलेली दिसत नाही. रूढ झालेल्या वृत्तांपासून नवीं वृतें पुढील प्रकारांनी निर्माण करण्यांत आलेलीं दिसतात. ( १) चरणारम्भींच्या गुरूच्या ठिकाणीं दोन लघू घालून अिन्द्रवंशा, रथोद्धता, स्वागता, वसन्ततिलका, शार्दूलविक्रीडित आणि स्रग्धरा या वृत्तांपासून
पान:छन्दोरचना.djvu/125
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही