पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने শুভহিত ও অন্ম जाति-जीवन आता ज्या पद्यप्रकाराचा विचार करावयाचा आहे तो थोडा गुन्तागुन्तीचा आहे. या प्रकारांत पद्याचें परिमाण जें कडवें म्हणून असतें त्यांत चरणांची सङ्ख्या निश्चित नसते. कित्येकदा तर, चरण कोणत्या पद्यविभागास म्हणावें हैं सुद्धा विचार करून ठरवावें लागेल. जे चरण कानाला सारखे वाटतात ते डोळ्याला सारखे दिसत नाहीत; कारण, लगक्रमाने आणि अक्षरसङ्ख्येने ते सारखे असतातच असें नाही. तथापि लघूची ओक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा या गणिताने ते सारखे असतात, आणि आवर्तनदृष्ट्या त्यांची मोडणी सारखी असते. पुन्हा, मात्रांची सङ्ख्या पाहतां दोन चरण सारखे असूनहि मोडणी भिन्न असल्यास त्यांना भिन्नभिन्नच गणावें लागतें. वरवर पाहतां या पद्यप्रकरांत अक्षरांची गणना न करितां मात्रांची गणना करण्यांत येते म्हणून याला मात्रावृत्त म्हणतात, पण ' जाति ? हें स्वतन्त्र नाव अधिक योग्य होअील. १ ध्रुवपद जातिरचना ही बहुतांशी गेय असते. आरम्भींचे ओक वा दोन चरण हे काही ठराविक चरणांचा गट सम्पल्यावर पुनःपुन्हा म्हणावयाचे असतात. ठराविक चरणांच्या अन्तराने पुनःपुन्हा म्हणावयाच्या या काव्यारम्भींच्या भागाला ध्रुवपद वा पालुपद वा अक्कण कडवें म्हणतात. अितर भाग घोळून घोळून पुनःपुन्हा म्हणावयाचे नसतात. ते आपण सरळ तडक म्हणत जातीं. त्यांच्या मानाने हा आरम्भींचा भाग भुव म्हणजे स्थायी, अचल असतो. ध्रुवपदाव्यतिरित भागाच्या मानाने धुवपदाची रचना ही कित्येकदा गुन्तागुन्तीची असते. सरळ वाचीत जाण्याने त्याची मोडणी प्रतीत होत नाही. मध्येच काही काही ठिकाणीं प्लुत अक्षर असतें वा विराम असतो.
पान:छन्दोरचना.djvu/361
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही