पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३३७ जाति-जीवन तेन् तेच शब्द पुन्हापुन्हा म्हणण्याचा विचार आपण पद्यप्रकार ठरावितांना करीत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक कडव्याच्या अन्तीं ध्रुवपदाची जी पुनरुक्ति होते तिचाहि विचार करण्याचें प्रयोजन नाही. हा पुनरुत्त होणारा भाग कडव्यांत मुद्रित केलेला असला तरी ती कडव्याबाहेरीलच गणला पाहिजे.
- सखे ग प्रशान्त किती यामिनी !
ही तशीच जलवाहिनी. धु० ही विशाळता कितितरी तव झुदार हृदयापरी ! करुं विहार चल तीवरी. १ सखे ग० ” (यध १४५) येथे * सखे ग प्रशान्त किती यामिनी ” या ध्रुवपदांतील चरणाचा समावेश कडव्यांत केलेला नाही. तथापि तो म्हटल्याविना कडवें पूर्ण झालेसें वाटत नाही म्हणून ‘ ही विशालता कितितरी तव झुदार हृदयापरी ! करुं विहारचल तीवरी सखे ग प्रशान्त किति यामिनी ! ” १ असें मुद्रण केललें असतें तरीहि * करूं विहार चल तीवरी ? या तिसव्या चरणाच्या अन्तींच कडवें पूर्ण होतें असें समजायला पाहिजे. असें समजलें की या पद्यांतील कडवें म्हणजे [- ।प । ७ +]था मात्रावलीची त्रिपदी ठरते. आता याच चालीवर म्हणावयाची अशी पुढील कविता पहा.
- ते हवेत माझे मला सखे, परि भवति सदा गल्बला. धु०
हे मधुप फुलांभोवती डोलती जस गुञ्जती, लोभले तेवि सोबती तयांचा ओघ न कधि आटला.” १ (यभा ४८)