पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३३९, जातेि-जीवन प्रस्तुत पद्याच्या कडव्यांत चारदा आहे. परन्तु येथे ती सारखी आवृत्ति कण्टाळवाणी वाटू नये म्हणून तीन आवृत्त्यांनन्तर आणि चाथ्या आवृत्तीच्या पूर्वी म्हणजे कडव्याच्या पोटांत [- । प। प। ७ +]या भिन्न मात्रावलीचे तीन चरण घालण्यांत आले आहेत. हे सयमक आहेत. कडव्याच्या पोटांतील या भिन्न पद्यविभागास अन्तरा म्हणतात. अन्त-यापूर्वी 'चाल पालटून' अशी सूचना लिहून ठेवण्याची मागे पद्धत होती; आणि अन्तरा सम्पल्यावर पुढील चरणाच्या आधी 'चाल पूर्वीची 'अशी सूचना असे. अन्तरा सम्पल्यावर कडवें पूर्ण होअीपर्यन्त पद्याचा जो ओक वा दोन चरणांचा विभाग पडतो त्याला मेळ म्हणतात. कडव्यांतील अन्त्यचरण हा बहुशः ध्रुवपदाशी सयमक असतो. तें यमक जणू काय धुवपदाच्या पुनरुत्तीची सूचनाच देतें. कडव्याचा अन्त्यचरण आणि ध्रुवपद यांचा मेळ अर्थाच्या दृष्टीनेहेि झुक्तम बसला म्हणजे धुवपदाची पुनरुत विशेष हृदयड्गम होते. यासाठी अर्थ ने यमक यांच्या दृष्टीने सर्व कडव्यांशी जुळेल असेंच धुवपद घ्यायला हव. अन्त-याचे चरण बहुशः तीन वा दोन असतात, क्रचित् अधिक असतात. अन्तरा अमुकच ओका मात्रावलीचा असतो असें नाही. अन्त-यासाठी बहुशः ओखाद्या -हस्व मात्रावलीची योजना करण्यांत येते. ओकाच जातीच्या पद्यांत ज्याप्रमाणे भिन्न भिन्न ध्रुवपदे आढळतात त्याचप्रमाणे ओकाच जातीच्या पद्यांत भिन्न भिन्न मात्रावलींचे अन्तरे आढळतात. यासाठी जातिनिर्णय करितांना भुवपदाप्रमाणेच अन्त-याचाहे विचार करावयाचा नसतो.*गोविन्दा मधुसूदना कमललोचना सख्या यदुविरा ” या देवनाथाच्या जातिरूप पद्यांत अन्तरा मालिनी वृत्ताच्या चतुष्पदीचा आहे ! * अबलामति प्रार्थिते हरीतें प्रेमयुक्त राधा ” या पद्यांत पादाकुलकाचा ओक अन्तरा असून पुढे १ ल्या कडव्यांत मालिनीचा श्लोक आहे तर अितर कडव्यांत वसन्ततिलकावृत्ताचा ओक ओक श्लोक आहे ! रामजोशीकृत 'झाली तरुणपणाची धूळ' या पद्यांतहि दोन अन्तरे आहेत. पण, अशीं दोन दोन अन्त-यांचीं पद्ये ओकन्दरीने दुर्मिळच आहेत. अन्तरा हा कडव्याच्या पोटांत, बहुशः भुत्तरार्धात असतो आणि त्याचे चरण कडव्यांतील अितर चरणांपेक्षा सङ्ख्येने झुणे असतात. ही गोष्ट ध्यानांत
पान:छन्दोरचना.djvu/366
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही