पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना * ο म्हणू शकतो. गायनांतै त्याला तालाची चमत्कृति करूनहि विस्ताराने विविधता साधत ओक विशिष्ट स्वरांचा थाट प्रतीत करून द्यावयाचा असतो. गायनाचें स्वारस्य अर्थांपेक्षा सुरावटीवर, आलापावर आणि विस्तारावर अधिक अवलम्बून असतें. अर्थबोध मुळीच झाला नाही तरी रस श्रुत्पन्न होोंधूं शकतो. मनाला मोहनी पडते. असें नसतें तर अर्थशून्य तराणे कोणी गाअिलेहि नसते आणि कोणी औकिलेहि नसते. गति म्हणून जो लघुकाव्यप्रकार कल्पिला आहे त्यांत अर्थस्वारस्य नि स्वरलालित्य हे गुण तुल्यबल असावे लागतात. रचना साधी, सोपी आणि सरळ असून घोळून घोळून म्हणायला आणि ’विस्तार करायला अनुकूल अशी असावी लागते. मराठी सङ्गीतनाटकांत मञ्जुळ चालींवर लिहिललीं लघुपद्ये अगणित असलीं तरी ' तुजविण गमे वृथा संसार'सारखी गीत या नावाला शोभतील अशीं फारच थोडीं आहेत. आणि हें गीत सुद्धा घोळून घोळून घटिका दोन घटिका म्हणायला जमणार नाही. यावरून अर्थस्वारस्य आणि गेयता हे दोन्ही गुण तुल्यबल टेअन रचना करणें किती कठिण आहे हैं स्पष्टपणें दिसून येतें. ज्या गीतांत सुरावट अधिक मोहक का अर्थ अधिक हृदयड्गम हें साङ्गणें कठिण जातें अशीं गीतें रचून तीं योग्य पद्धतीने गाभून दाखवितां यायला, म्हणजे वाग्गेयकार व्हायला सङ्गीताचें ज्ञान अपरिहार्य आहे. (पुरन्तु कवीला वा रसिक वाचकाला या ज्ञानाची मुळीच Tx-. •r-M'x-M X X xV's V w w W-W WIW WA-MYWA W W-W W-W W-W YMWYr १ 'प्रार्थना, वेदपठन, धार्मिक मन्त्र, पोथीवाचन, वृत्तरचना, दिण्डी,साकी, दोहा, पोवाडा, गळ्यावरचीं गाणीं, अभङ्ग, ठुमरी, टप्पा, धृपद, धमार, ख्याल अशा चढत्या क्रमाने लोकगानांतून शास्त्रीय गायनामध्ये सङ्गीताचें परिवर्तन झाल्याचें दिसून येतें. लोकगानाची सर्वांत अखेरची पायरी म्हणजे गणवृत्त अथवा मात्रावृत्त याचें गायन होय. अशा गानांत जास्तीत जास्ती नक्षू स्वर येतात. अशा गानांत बरेंचसें गेयत्व दिसतें. पण शास्त्रीय सङ्गीताप्रमाणे रागत्व किंवा ठराविक असा ओखादा राग निर्माण होत नाही. लोकगान व शास्त्रीय गायन यांमध्ये पहिल्यांत तालाचा अभाव असतो. पोवाडा हा लोकगान व भावनाप्रधान जोरदार भाषण यांमधील दुवा आहे.” श्री. ग. ह. रानडे (पहा भारतीय सङ्गीत ३/२).
पान:छन्दोरचना.djvu/37
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही