पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना या पादाकुलकाच्या चरणांत जाड ठशांनी मुद्रित केलेलीं अक्षरें हीं आठव्या आणि नवव्या मात्रांच्या संयोगस्थानीं असल्यामुळे चरण कर्णकटु होतात अितकेंच नव्हे तर त्यांची मोडणी निराळी वाटते. हे चरण [। प । प] असे पादाकुलक न वाटतां [-- । प।--] असे होतात. (२) शब्दांत लागोपाठ येणारे जे दोन लघु ओरव्ही ओकत्र झुचारिले जातात त्यांचा विग्रह करावा लागल्यास तो कर्णकटु होतो. झुदाहरणार्थ, * दशरथें? हा शब्द ओरव्ही दश-रथें (- ७ -) असा झुचारिला जातो तो जर * द-शरथें? (७ --) असा झुगाचारावा लागला तर तो कानाला कटु लागतो. मोरोपन्ताच्या पुढील चरणांत तसा कर्णकटु झुपयोग आहे, “ । पुत्र वियोगे । व्याकुल होक्षुन । वरिला मृत्यु द-। शरथे ' याच प्रमाणे ' वचकोनि” शब्दाचा झुचार स्वाभाविकपणें वच-कोनि (--७) असा होतो; पण पद्यासाठी जर त्याचा झुचार व-चकोनि (~ , ७ - ~ ) असा केला तर तो श्रवणोद्वजक होतेो.
- ते गतगौरव कौरव रौरव पौर व-चकोनेि पळतात ” या मेौरोपन्ती रचनेंतील आरम्भींचें पदलालित्य जितकें हृदयङ्गम आहे तितकाच पुढील पदविच्छेद झुद्रेगजनक वाटतो.
(३) ओखाद्या शब्दांतील अन्त्य फटिड्ग लघु आणि पुढील शब्दांतील आद्य फटिङ्ग लघु यांचा योग आवर्तनाच्या पहिल्या नि दुस-या मात्रांच्या ठिकाणीं, आणि पाचव्या नि सहाव्या मात्रांच्या ठिकाणीं युक्त वाटत नाही; तिस-या नि चौथ्या वा सातव्या नि आठव्या मात्रांच्या ठिकाणीं तो योग चालतो. मोरोपन्ताच्या कल्याणरामायणांतील ‘निघतां प्रभु हा- । य वैदे पुरतें।” ‘ सौमित्रिस धा- । व म्हणे सीता।” हे चरण कटु लागतात कारण ' धाव? शब्दांतील अन्त्य फटिङ्ग 'व' आणि *म्हणे? मधील आद्य फटिडू *म्ह” यांचा योग आवर्तनाच्या पहिल्या नि दुस-या मात्रांच्या ठिकाणी द्वैतो. शठदक्रम । ‘हायु वृदे मधु। निघतां पुरतें ” । ‘ धाव म्हणे सौं- । मित्रिस सीता ?