पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ԿՅ* लयबद्ध अक्षररचना होय, ही मूलभूत गोष्टहित्याच्या ध्यानांत आली नाही.चौदा लघू आणि एक गुरु मिळून होणा-या एकाच लगावलीपासून यतिभेदाने मणिगुणनिकर, चन्द्रावर्ता आणि माला अशीं तीन भिन्न वृतें सिद्ध होतात (पि ७/११-१३) हें त्याच्या ध्यानांत येथूनहि तीं वृतें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षण्मात्रक आवर्तनांच्यामुळे भिन्न भिन्न होतात ही कल्पना त्याला सुचली नाही. ही कल्पना त्याला सुचती तर त्याचा जातिविचारहि सखोल आणि शास्त्रशुद्ध झाला असता. तथापि पिङ्गल हा एका प्राचीन आणि प्रचलित अशा त्रिकावलम्बी सम्प्रदायाचा संस्थापक आहे याविषयी शड्रा नाही. छन्दःसूत्रकार पिङ्गलाचा काल ठरविणें हें संस्कृतज्ञ पण्डिताचें काम आहे. पण ओक गोष्ट येथे दाखवून ठेवणें अगत्याचें आहे. गाथाप्रकरणीं अतिशायिनी आणि विस्मिता या दोन वृत्तांचीं लक्षणें दिलीं आहेत. अतिशायिनी आणि विस्मिता हीं नांवें अनुक्रमें शिशुपालवधांतील (८/११) आणि (२०/७९) या श्लोकांवरून सुचलीं असावींत हें झुघड आहे. तसें असल्यास पिङ्गल माघानन्तर झाला असें मानिलें पाहिजे, पण हें खरें वाटत नाहीं. तीं सूत्रेंच पाठीमागून कोणीतरी घुसडून दिलीं असण्याचा सम्भव आहे. हलायुधाने दिलेल्या सा-या झुदाहरणांचे झुगम सापडले तर छन्दःसूत्रकार पिङ्गलाचा काळ निश्चित करावयाला काही साह्य होअील. २ भरताचें नाट्यशास्त्र नाट्यशास्त्राचा कर्ता भरतमुनि हा पिङ्गलाच्या सम्प्रदायाहून निराळा असा जो सम्प्रदाय आहे त्याचा आद्य नसला तरी बराच प्राचीन असा आचार्य आहे. दुर्दैवाने नाट्यशास्त्राची झुपलब्ध असलेली आवृत्ति ही झुघडपणें वाढविलेली आहे आणि अशुद्धहि आहे. अर्थातच तिच्यावरून काही अनुमान काढावयाला ती तितकी विश्वसनीय नाही. झुदाहरणार्थ, मदनवती (४६८) ह वृत्त काव्यमाला आवृत्तींतच आहे; तर चित्तविलासित (६०९) हें गायकवाडी आवृत्तीतच आढळतें. पुन्हा नाट्यशास्त्राच्या काव्यमाला आवृत्तींत (१५॥३२) शालिनी वृत्तांत यति साङ्गितलेला नाही; पण चौखम्बा आवृत्तींत (१६।३६) तो साङ्गितलेला आहे. आणि भरत हा तर यति न मानणा-यांपैकी होता असें स्वयम्भूचें वचन आहे. यति न
पान:छन्दोरचना.djvu/569
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही