पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५५१ छन्दःशाख्त्राचा अितिहास न्त्र्यहि तो दवडीत नाही. वंशस्थ, प्रहर्षिणी, रुचिरा, वीरललिता, सुवदना अित्यादि वृतांना तो अनुकमें वसन्तमञ्जरी, मयूरापिच्छ, सदागति, प्रमुदिता, वृत्त अशीं नांवें देतो. श्यामा, गुर्वी, कुसुम आणि हयलीलाङ्गी हीं वृतें तो नवीन साङ्गतो. दोहाजाति ही विरहाङ्क अितर छन्दःशास्त्रकारांप्रमाणें तेरा आणि अकरा मात्रांची न मानितां चौदा आणि बारा मात्रांची मानितो त्या अर्थी पादान्तीं येणारे लघू दिसायला लघु असले तरी झुचारतः गुरु होत असल्याने त्यांना तो गुरु मानती हैं झुधड आहे. ७ जयदेवकृत छन्दोवृत्ति छन्दोवृत्ति हा जयदेवाचा ग्रन्थ असून त्यावर हर्षटाची विवृति आहे. हा यतिवादी होता. * विराम यतिरिति? असें हा १ ल्या अध्यायाच्या शेवटीं म्हणतो. नकुंटक हें वृत्तनाम प्रथम जयदेवाने दिलें असें हेमचन्द्र म्हणतो आणि विरहाङ्क हा नर्कुटक हेंच नाव देतो त्याअर्थी जयदेव हा विरहाङ्कापूर्वी झाला असावा असें प्रो. वेलणकर म्हणतात. परन्तु नकुंटक हैं नांव वराहमिहिराने दिलें आहे; त्याच्या आधी तर जयदेव होऊन गेला नाही ना ? आणि पुन्हा हेमचन्द्र हा ' नकुंटकमिति जयदेवः,? एवढेच म्हणतो. याचा अर्थ नकुंटक हैं नांव प्रथम जयदेवाने दिलें असा होॐ शकत नाही. ८ स्वयम्भूच्छन्द स्वयम्भूच्छन्द' हा ग्रन्थहि प्रो. हरेि दामोदर वेलणकर यांनीच सम्पादून प्रकाशित केला आहे. त्यांच्या मतें हा जैन छन्दःशास्त्रकार आधींत आधी १० व्या शतकांत होऊन गेला असावा. प्राकृत जाति आणि प्राकृत काव्य यांच्या दृष्टीनेहि हा ग्रन्थ फार महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने हस्तलिखिताचीं पहिलीं काही पानें गहाळ झाल्याने अतिजगती वर्गातील रुचिरा आणि कनकप्रभा (या वृत्ताला तो नन्दिनी म्हणतो) हीं दोन वृतें वगळल्यास चौदा-अक्षरी वृत्तापर्यन्तचा सर्व वृत्तांचा वृत्तान्त नष्ट झाला आहे. तथापि याने दिलेल्या विषम अर्धसम आणि सम वृत्तांची सङ्ख्या काही लहान नाही. पुढे हेमचन्द्राच्या छन्दोनुशासनांत आढळणारीं कितीतरी नवीन वृतें स्वयम्भूच्छन्दांत प्रथम पहायला मिळतात. हा वृत्तलक्षण प्राकृतांत साङ्गून नांवहि प्राकृतांतच देतो. मात्र तें लक्षण त्याच वृतांत रचिलेलें असतें; जसे
पान:छन्दोरचना.djvu/574
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही