छन्दोरचना «Հա8 ११ क्षेमेन्द्रकृत सुवृत्ततिलक क्षेमेन्द्रकृत सुवृत्ततिलकांत बहुतेक ठळक वृत्तांचाच विचार केला आहे; तथापि तनुमध्या, कुमारललिता, भुजगशिशुसृता या क्षुद्र वृत्तांना आरम्भीं तो स्थान देतोच. पण या -हस्व वृत्तांविषयी तो म्हणतो, 'न षट्सप्ताक्षरे वृत्ते विश्राम्यति सरस्वती भृङ्गीव मल्लिकाबालकलिकाकोटिसङ्कटे ' (क्षेसु २२) हें त्याचें म्हणणे मोठ्या गमतीने पटतें. सुवृत्ततिलकाचे तीन विन्यास आहेत. पहिल्या विन्यासांत ठळक वृत्तांचीं लक्षणें पिङ्गलोक्त पद्धतीने पण अनुष्टभांत दिलीं असून नन्तर स्वरचित झुदाहरणें भरताप्रमाणे दिलीं आहेत. दुस-या विन्यासांत निरनिराळ्या वृत्तांत अक्षररचना कशी असावी हें साङ्गितलें आहे; आणि गुणदोषप्रदर्शनासाठी निरनिराळ्या कवींच्या कृतींतून त्याने झुदाहरणें दिलीं आहेत. तो स्वतःचीहि चूक दाखवायला भीत नाही; तथापि ओकन्दरीने पहातां क्षेमेन्द्राची ही विचारसरणी विचित्र आणि निराधार वाटते. तिस-या विन्यासांत तो कोणतें वृत्त कोणत्या विषयाला वा रसाला योग्य होऔल हे साङ्गतो; झुदाहरणार्थ, ‘ साक्षेपक्रोधधिकारे परें पृथ्वी भरक्षमा प्रावृष्ट्प्रवासव्यसने मन्दाक्रान्ता विराजते” (क्षेसु ३/२१) हें त्याचें म्हणणें पटत नाही. या विन्यासांत शेवटीं कोणतें वृत्त लिहिण्यांत कोणाचा हातखण्डा होता हैं क्षेमेन्द्राने साङ्गितलें आहे; परन्तु हेंहि समाधानकारक वाटत नाही. तो म्हणतो, “ सुवशा कालिदासस्य मन्दाक्रान्ता प्रवल्गति सदश्वदमकस्येव काम्बोजतुरगाङ्गना.' (क्षेसु ३/३४) परन्तु कालिदासाचें सरस पद्यप्रभुत्व मेघदूतांत तेवढे दिसतें आणि रघुवंशाच्या निरनिराळ्या वृत्तांत लिहिलेल्या सर्गात दिसत नाही असें थोडेच आहे! अजविलाप ज्याने वाचला आहे तो कालिदासाला वियोगिनीवृत्त विशेष सरसतेने पेलतां आलें नाही असें म्हणू शकेल काय ? १२ नागवर्माचा छन्दोम्बुधि (कानडी ) खिस्तशके १००० च्या अलीकडे पलीकडे कर्नाटकांत नागवर्म नांवाच्या छन्दःशास्त्रकाराने छन्दोम्बुधि नांवाचा ग्रन्थ लिहिला. या ग्रन्थाची डॉ. किटेलूने
पान:छन्दोरचना.djvu/577
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही