पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 心āa छन्दःशाख्ञाचा अितिहास' परन्तु बहरे रजझूला ते हरिगीता म्हणतात हें चुकीचें आहे. हरिगीता हें वृत्त नाही. ती जाति आहे. २५ रणपिङ्गल वृत्तांचा सर्वांत मोठा सङ्ग्रह रणछोडभाअी झुदयराम यांच्या गुजराथी रणपिङ्गल या ग्रन्थांत आहे. त्यांनीहि अरबी-फार्सी वृत्तांचा समावेश आपल्या ग्रन्थाच्या ओका भागांत केला आहे. ग्रन्थारम्भों छन्दोविषयक ग्रन्थांची एक नाममाला दिली आहे; पण ते ग्रन्थ कोणत्या भाषेतले आहेत, कितपत साधार आणि विश्वसनीय आहेत, याची कोठे चर्चा केलेली नाही. वृतें देतांना केव्हा केव्हा अमुक ग्रन्थांत अमुक नांव आहे अशी मोघम नोन्द केली आहे. सङ्ग्राहकता हा एकच गुण या पुस्तकाचा आहे असें म्हणतां येऔील. छन्दःशास्त्राचा हा गेल्या १५०० हून अधिक वर्षांचा आितिहास पाहिला की एक प्रकारचें असमाधानच वाटतें. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय या मूलभूत सिद्धान्ताच्या जवळ जवळ येऊन छन्दःशास्रकार पुन्हा रुळलेल्या मार्गाने जातात. छन्दःशास्त्राची पुनर्घटना करण्याचा प्रयत्न कोणी करित नाही. कोणी थोडीं वृतें देतो, कोणी पुष्कळ वृतें देतो. लक्षण साड्गण्याची कोणी त्रिकावलम्बी पद्धत घेतो तर कोणी विशिष्ट परिभाषा निर्माण करून त्या भाषेने साड्गतो, यापलीकडे त्यांच्या कृतींत भेद नाही. कोणी दुस-यांनी रचिलेलीं झुदाहरणें देतात, कोणी स्वतः रचून तीं घालतात. पण वाङ्मयाचें मन्थन करून छन्दःप्रकार कसे परिणत होत आले याचें विवेचन कोणी करीत नाही. आधार देण्याची बुद्धि तर कोणालाच होत नाही. ज्या सामग्रीवरून ओखादा सिद्धान्त ठरवायचा वा दुस-याचा सिद्धान्त पारखायचा तीच पुढे नसल्थाने त्या सिद्धान्ताची चर्चा होोंधूं शकत नाही. २६ छन्दोरचना प्रस्तुत ग्रन्थाने वर दाखविलेल्या झुणीवा दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पद्यरचना ही वृत्तजातिछन्दःस्वरूप अशी त्रिविध आहे हें मी शोधून विस्ताराने दाखवून दिलें आहे, आणि पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय हा छन्दोलङ्कारकारास प्रथम सापडलेला पण मलाहि स्वतन्त्रपर्णे सुचलेला सिद्धान्त मी सर्वत्र लावून दाखविला आहे. यासाठी पद्याचे पद्मावर्तनी,
पान:छन्दोरचना.djvu/586
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही