पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Կ**3 अग्न्यावर्तनी, भ्रङ्गावर्तनी आणि हरावर्तनी असे चार भेद कल्पिण्यांत आले आहेत. वृत्तप्रकरणीं प्राचीन छन्दःशास्रकारांनी दिलेल्या वृत्तांचा आणि लक्षणसूत्रांचा या ग्रन्थांत समावेश आणि झुछेख केलेला असून त्यांचें वर्गीकरण प्राचीन पद्धतीने अक्षरसङ्ख्येप्रमाणे न करितां मोडणीच्या साम्याप्रमाणे अभिनव पद्धतीने केलेलें आहे. नावांचा माजलेला घोटाळा जवळ जवळ नाहीसा केला असून वाङ्मयाचें मन्थन करून वृत्तांचीं प्राचीन आणि दुर्मिळ अशीं झुदाहरणें दाखवून दिलीं आहत. या मन्थनांत जीं वृतें नामनिर्देशाने प्रसिद्ध नव्हती पण प्रयोगरूपानें आढळलीं त्यांचा पूर्ण परामर्श घेतला आहे. जातिविषयक आणि छन्दोविषयक चर्चा करणारीं प्रकरणें हीं सर्वस्वी जेथे जेथे आधार सापडला तेथे तेथे तो दिला आहे. आधार गावला नाही तेथे तसें स्पष्ट साङ्गून टाकिलें आहे. त्यामुळे ज्यांना माझी विचारसरणी पटत नसेल त्यांना सुद्धा सारी सामग्री अभ्यासासाठी झुपलब्ध करून ठेविली आहे. माझ्या हातून झालें तें मी केलें आहे. कन्नड कवि लक्ष्मीश याच्या जैमिनीभारताची रचना मला वाचून पहातां गद्यस्वरूप वाटली परन्तु औकून पाहतां ती जातिस्वरूप असून तींत रगणाचीं आर्वतनें आहत. अशा काही चुका या ग्रन्थांत होञ्थून गेल्या असतील. पाठीमागून येणारे छन्दःशास्त्रज्ञ असले दोष काढून टाकितील आणि ज्ञानांत अधिक भर घालतील. कालाप्रमाणेच शास्त्र अनन्त आहे. तो अन्त पाहण्याची आशा मत्र्याला कशाला ? नामें * माधव जूलियन् ? रचुनि जो काव्यें मराठी नवा साहित्यीं पटवर्धनद्विजकुल प्रख्यातितें पोचवी; फार्सीकोशहि औतिहासिक रची अन्। त्याचिया मागुनी तो छन्दोरचना रचूनि विनयें दावी जनांना गुणी. सन्मार
पान:छन्दोरचना.djvu/587
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही