Q रिँसहावलोकन पण या ग्रन्थांत अनेक झुणीवा राहून गेल्या होत्या. प्राकृत पैङ्गलाचा झुपयोग करून घेण्यांत आला असला तरी प्राचीन संस्कृत छन्दःशास्त्रकारांनी वृत्तांची चर्चा कशी केली आहे आणि संस्कृत कवींनी त्यांची सम्भावना कशी केली आहे याचा विचार करण्यांत आलेला नव्हता. पुन्हा जाति आणि छन्द यांत आढळणारी आवर्तनात्मकता वृत्तांत कोठे आणि कशी आढळते याचाहि शोध घेण्यांत आला नव्हता. म्हणून छन्दोरचना प्रकाशित झाल्यानन्तर २-३ वर्पोनीच मी पुन्हा या विपयाचा अभ्यास आरम्भिला. भरतपिङ्गलादि संस्कृत छन्दःशास्त्रकारांचे ग्रन्थ अभ्यासून आणि संस्कृत नि मराठी प्राचीन-अर्वाचीन वाङमय डोळ्याखाली घालून, पुष्कळच नवीन सामग्री मिळवून, जुळवून आतां छन्दोरचना हा ग्रन्थ अथपासून अितिपर्यन्त नवीनच लिहून काढलेला आहे. याला पूर्वीच्या आवृत्तीचा आधार आहे आणि ओकदा प्रसिद्ध झालेलें नाव पालटण्यांत अर्थ नाही म्हणूनच छन्दीरचना हें नाव तसेंच ठेविलें आहे. ताडून पहाणाराला ही दुसरी आवृत्ति म्हणजे वस्तुत: जवळ जवळ नवीनच असा ओक ग्रन्थ आहे हैं स्पष्ट दिसून येअील. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय हें साधे तत्व जें पूर्वीच्या छन्दःशास्त्रकारांना सापडलें नाही आणि ओका आधुनिकाला अगदी पुसटपुसटच दिसलें तें मला परिश्रमान्तीं हळूहळू स्पष्ट होत गेलें. या तत्त्वाप्रमाणे, पद्यरचना ही वृत्तस्वरूप असिो, वा जातिस्वरूप असो वा छन्दःस्वरूप असी, ती कशी सम, अर्धसम आणि विपम असू शकते हैं या ग्रन्थांत विस्ताराने दाखविलेलें आहे. छन्दःशास्त्राची काहीतरी व्यापक आणि पायाशुद्ध अशी घटना आता निश्चित केलेली आहे. अश्वघोषापासून जगन्नाथरायापर्यन्तचे संस्कृत आणि अद्ययावत्। मराठी प्रसिद्धअप्रसिद्ध कवि यांचा योग्य तो परामर्श घेण्यांत आला आहे. कोठे काही महत्त्वाचें वगळलें गेलें असल्यास तें अनवधानानेच वगळलें गेलें आहे याविषयी सन्देह नसावा. कोणाच्याहि श्रेयाचा अपहार करण्याचा प्रयत्न केलेला नाही. दिण्डी-शारदा अित्यादि ४-५ मात्रावलींचा विचार करितांना श्री. गोविन्दराव टेम्बे आणि श्री. वामनराव पाध्ये यांच्याशी मी विचारविनिमय केला होता ही गोष्ट येथे साभार साङ्गून टाकितों, तथापि मुख्य कार्य सारें मी ओकट्यानेच केलेलें आहे.
पान:छन्दोरचना.djvu/8
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही