पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कधी रुग्णाच्या चष्म्यातून, कधी कुणाचा नातेवाईक म्हणून, कधी एक तिहाई म्हणून आणि काही वेळा तर गर्दीतला एक बिनचेहऱ्याचा माणूस म्हणून सभोवतालच्या घटनांकडे पाहत गेलो, निरखत गेलो. लिहीत गेलो. वाटले... 'जगण्यात अर्थ आहे. ' आपल्या हाती हे पुस्तक देताना मनात विविध भावना दाटल्या आहेत. आनंद तर ओसंडतोय. मला भेटलेल्या सर्वांनी मला काहीतरी शिकवलंय, त्यातूनच हा लेखनप्रपंच झालाय याची मला जाणीव आहे. 'जनस्वास्थ्य' च्या पहिल्या अंकापासूनच्या सर्व साथीदारांची मला आठवण आहे. डॉ. साहेबराव गावडे, डॉ. सुधाकर वाले, डॉ. वैशाली भोसले (गुजर), डॉ. उल्हास देवडकर, श्री. प्रकाश झळके यांची त्या त्या काळातील साथ मोलाची. यातील लेख ‘जनस्वास्थ्य' मध्ये प्रसिद्ध करण्यापूर्वी पहिली वाचक नि समीक्षक म्हणून सौ. अर्चनाने काटेकोर (काटेरी नव्हे) भूमिका निभावली. हे लेख पुस्तकरूपाने आणण्यासाठी सन्मित्र श्री. उदय वेलणकर यांनी खूप मेहनत घेतली. 'अक्षता प्रकाशन'च्या श्री. संजय निलंगे यांनी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने प्रकाशनाची जबाबदारी उचलून ती वेळेत आणि अत्यंत सुबक निर्मितीच्या रूपाने पार पाडली. ‘गमभन’च्या श्री. ल. म. कडू यांनी अत्यंत सुंदर, अनुरूप नि बहारदार मुखपृष्ठ केले की मुखपृष्ठ पाहता क्षणी मी मनातल्या मनात टुणकन् उडी मारली. या सर्वांचे आभार मानण्याऐवजी त्यांच्या ऋणांत राहणे मला आवडेल. जाता जाता, विस्तारभयाची भीती झटकून काही शब्द... वाचकहो, पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनापूर्वी काही घटना घडल्या. हस्तलिखिते जेव्हा प्रकाशकांकडे गेली, तेव्हा त्यानी पुस्तकाचे शीर्षक 'जगण्यात अर्थ आहे' ऐवजी 'शोध सुखाचा' असावे, असे सुचविले. त्याप्रमाणे निर्मितीने वेग घेतला. प्रकाशनाची तारीख ठरली. प्रकाशन सांगलीस म्हणून कार्यक्रमाची आणि पत्रिकांची जबाबदारी माझ्यावरच होती. अर्थात हा एक जोडकार्यक्रम होणार होता. मा. डॉ. तारा भवाळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही याच वेळी होते. 'शोध सुखाचा' या शीर्षकाने पत्रिकाही छापून झाली. दरम्यान