पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुलांना मुठीत नको; मिठीत ठेवा “माझी मुलं माझ्या ताब्यात आहेत; माझ्या शब्दाबाहेर नाहीत... आमच्या घरात 'या' चा कायदा आहे... आमच्या यांना अजिबात वावगं खपत नाही." ही आणि या प्रकारची वाक्ये आपण पावलो-पावली ऐकत असतो. कदाचित आपला किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचाही यांत समावेश असेल. 'कुटुंब' म्हटले की आपल्या डोळ्यां- समोर एक सुंदर, हसते-खेळते चित्र उभे राहते. अर्थात 'एखाद्या कथा-कादंबरीतल्या किंवा सिनेमा-नाटकातल्या (बहुधा) पूर्वार्धातील हसरे कुटुंब आणि आपले कुटुंब यांत साम्य आहे का?' याचे उत्तर 'होय' असेल तर यापुढचा मजकूर हसत-खेळत वाचला जाईल यात शंका नाही. पण याचे उत्तर 'नाही' असेल तर...? मुलांना मुठीत नको; मिठीत ठेवा । १०१