पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, प्रकाशक श्री. निलंगे यांचा मला फोन आला, 'मेलवर मुखपृष्ठ पाठवले आहे, ते बघा. मुखपृष्ठ पाहिले. सुंदरच होते. पण मुखपृष्ठावरचे शब्द 'शोध सुखाचा' नव्हे तर 'जगण्यात अर्थ आहे' हे होते. निलंगेंना फोन लावला. त्यांनी खुलासा केला, 'सर्व लेख वाचल्यानंतर आम्हांला तुमचेच शीर्षक योग्य वाटले.' अर्थात पत्रिका बदलून घेतल्या; पण त्यानंतर काही घटना अशा घडल्या की, या बदललेल्या पत्रिकेत ठरल्यावेळी प्रकाशनाचा योग नव्हता. प्रकाशनसमारंभ पुढे ढकलला आणि तो उत्कृष्टरीत्या पार पडला. या साऱ्या गडबडीत मूळ प्रस्तावना पहिल्या आवृत्तीत आलीच नाही. वाचकहो, 'जगण्यात अर्थ आहे...' या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. त्यामुळे 'हे पुस्तक प्रकाशित करण्यात अर्थ आहे' ही आमची समजूत चुकीची नव्हती हे सिद्ध झाले. ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना तिच्यात काही बदल केले आहेत. पुस्तकातील पृष्ठांची रचना, अक्षराचे वळण यांतील बदल ठळकपणे लक्षात येण्यासारखे आहेत. मजकूर बहुतांशी तोच आहे, परंतु विचाराच्या मांडणीत आणखी सफाईदारपणा येण्यासाठी किंवा लक्षात आलेल्या शुद्धलेखनाच्या दुरुस्त्या करण्यासाठी आवश्यक तेवढे बदल केले आहेत. मजकुराचाही काही ठिकाणी थोडा विस्तार केलेला आहे. याही आवृत्तीला आपला उदंड प्रतिसाद मिळेल अशी खात्री वाटते. 'आशिष', पाचवी गल्ली, गणेशनगर सांगली ४१६४१६ मोबा. ९८६०८५२३८५ Email : anms@rediffmail.com १० । जगण्यात अर्थ आहे.. डॉ. अनिल मडके एम. डी. (चेस्ट) एफ. सी.सी.पी. छातीरोग विशेषतज्ज्ञ